- रायगड - निसर्ग चक्रीवादळाचा सर्वधिक फटका रायगडमध्ये बसला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 5 जून रोजी रायगड दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात दौरा करणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
वाचा सविस्तर - आज मुख्यमंत्री रायगडात; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा करणार दौरा
- मुंबई - निसर्ग वादळाच्या संकटातून बचावलेल्या महाराष्ट्रात आज १ हजार ३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २ हजार ९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
वाचा सविस्तर - CoronaVirus : आतापर्यंत ३३, ६८१ रुग्णांना घरी सोडले, तर राज्यात ४१, ३९३ रुग्णांवर उपचार सुरू
- मुंबई - कोकण किनारपट्टीवर आलेले चक्रीवादळाचे संकट टळले असले तरी त्यामुळे हवामान विभागाने मुंबईत पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज मुंबईत कुलाबा येथे ४९.६ मिमी तर सांताक्रुझ येथे ४७.० मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २४ तासात शहर व उपनगरांत आकाश ढगाळ राहून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वाचा सविस्तर - येत्या २४ तासात मुंबईत गडगडाटासह होणार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
- मुंबई - निसर्ग चक्रीवादळाने पालघर, पुणे आणि रायगडसह राज्यातील १४ ते १५ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार शनिवारपासून राज्यातील प्रभावग्रस्त नऊ जिल्ह्यांना भेटी देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बैठकाही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाचा सविस्तर - निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, विजय वडेट्टीवार यांचे आदेश
- हैदराबाद - संयुक्त राष्ट्राद्वारे पर्यावरणाचे संरक्षण आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जगातिक स्तरावर पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम 100 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस लोकांपर्यत पोहोचण्यासाठी खूप प्रभावीही ठरत आहे.
वाचा सविस्तर -जागतिक पर्यावरण दिन: थोडं थांबा...अन् जैवविविधतेकडं लक्ष द्या
- मुंबई - देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असूनही अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मे रोजी लॉकडाऊनचा नवा टप्पा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये आणखी शिथिलता देण्यास राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे.
वाच सविस्तर -मिशन बिगिन अगेन : राज्यात लॉकडाऊनच्या नियमात सुधारणा, 'हे' आहेत नवीन नियम
- नागपूर - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागपूर महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने त्रिस्तरिय फेस मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. घराबाहेर, सार्वजनिक, इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या बाबतचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. एवढेच नाही तर मास्क न वापरल्यामुळे एकाच व्यक्तीकडून तिन वेळा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारपासून हे आदेश अंमलात येणार आहेत.
वाचा सविस्तर- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; मास्क न वापरल्यास लावणार २०० रुपये दंड
- रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले असल्याने लोक बेघर झाले आहेत. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हजारो विजेचे खांब कोसळल्याने गावच्या गावे अंधारात आहेत. बुधवारी आलेल्या या चक्रीवादळात अलिबाग, श्रीवर्धन, माणगाव या तालुक्यातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
वाचा सविस्तर -निसर्ग'चे तांडव : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे शेकडो कोटींचे नुकसान
- सांगली - शिरच्छेद करुन देवराष्ट्र येथे युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जयसिंग जमदाडे असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देवराष्ट्र-शिरगाव रस्त्यावर गुरुवारी शीर आणि धड वेगळे असलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.
वाचा सविस्तर - अनैतिक संबंधाच्या संशयातून कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाचे धडावेगळे केले शीर, आरोपी पसार
- मुंबई - कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शहरात चित्रपट, टीव्ही कार्यक्रम इत्यादीच्या शूटिंगला परवानगी दिल्यानंतर चित्रपट निर्माते संजय गुप्ता म्हणाले की, रामोजी फिल्म सिटीमध्ये आपला आगामी मल्टीस्टारर 'मुंबई सागा' पूर्ण करणार असून यासाठी तो हैदराबादला जात आहे.
वाचा सविस्तर - रामोजी फिल्म सिटीत पार पडणार 'मुंबई सागा'चे उर्वरित शूटिंग, संजय गुप्ताने दिली माहिती