ETV Bharat / state

सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात सूचनांसाठी उद्या शेवटचा दिवस

सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात सूचना देण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे.

सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा
सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा
author img

By

Published : May 25, 2023, 5:13 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात मराठीसह अन्य विषयांचे अनेक सिनेमे प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही सिनेमांना सिनेमागृहे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळेच येणाऱ्या काळात सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची माहिती दिली आहे. मराठी सिनेमांना सिनेमागृहांमध्ये प्राईम टाईम उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचे सूतोवाच केले होते.

१५ दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी निवेदने द्यावीत - मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत निश्चित कार्यप्रणाली करण्यामागे सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असून यासाठी गृह विभागासह विविध विभागांचा समन्वय आवश्यक असणार आहे. सिनेमागृहांमध्ये मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. आज एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मराठी चित्रपट सृष्टीस गतवैभव प्राप्त करून देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत १५ दिवसांमध्ये मराठी सिनेमा निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत असे सांगण्यात आली होती. त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याविषयाबाबत विस्तृत बैठक १५ जूननंतर घेण्यात येईल असेही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

नियमावली तयार करण्यात येईल - आज अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असताना याबाबतही काही नियमावली तयार करता येईल का, याबाबतचा अभ्यासही करण्यात यावा अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी सर्वच संबंधितांना दिल्या आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे, मराठी सिनेमांचे निर्माते, दिग्दर्शक तसेच सिनेमागृहांचे मालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  1. Ravrambha Movie Premiere : 'रावरंभा'च्या प्रीमियरला लोटली चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी!
  2. Gemadpanthi web series : थरारक रशरशीत कॉमेडी गेमाडपंथीमध्ये पूजा कातुर्डे दिसणार बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजात!
  3. Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : करण जोहरने करुन दिली रंधावा आणि चटर्जी कुंटुंबीयांची ओळख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.