ETV Bharat / state

विधानपरिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची उद्या अखेरची मुदत - NCP news

विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे.

विधान परिषद
विधान परिषद
author img

By

Published : Nov 16, 2020, 6:44 PM IST

मुंबई - विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. पाचही मतदार संघात तब्बल २७८ उमेदवार रिंगणात आहेत. यातील मुख्य राजकीय पक्षांनी अनेक ठिकाणी डमी उमेदवार उभे केले असून ५९ उमेदवारांचा अपवाद वगळल्यास तब्बल २१९ उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही ठिकाणी भाजपचेही मते खाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही पहिल्यांदाच पाच पैकी चार मतदार संघात आपले उमेदवार उभे केले असून त्यासोबत आम आदमी पार्टीही दोन ठिकाणी यावेळी चाचपणी करण्याच्या तयारीला लागली आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद या तीन पदवीधर तर पुणे व अमरावती या दोन शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरु आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असेच सध्या चित्र असले तरी अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह इतर अनेक स्थानिक पक्षांनीही आपले उमेदवार मैदानात उभे केल्याने ही निवडणूक मोठी रंजक ठरण्याची शक्यता आहे. त्यातच मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असल्याने त्यानंतरच नेमकी लढत कोणत्या पक्षाच्या उमेदवारांची असेल हेही चित्र स्पष्ट होणार आहे.

वंचितचे उमेदवार प्रभावी ठरतील काय?

राज्यात मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अनेक ठिकाणी विजयापासून रोखून धरण्यासाठी भूमिका बजावलेल्या वंचित बहुजन आघाडीने अमरावती शिक्षक मतदार संघाचा अपवाद वगळता पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदार संघातून आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे या निवडणुकीत वंचितचे उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढविण्याची शक्यता आहे.

औरंगाबादवर सर्वात जास्त फोकस

वंचित बहुजन आघाडीने पदवीधर मतदार संघांपैकी औरंगाबाद मतदार संघात सर्वाधिक फोकस करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी या मतदार संघात आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अनेक ठिकाणी सभा, रॅलीही काढल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. औरंगाबाद पदवीधरमधून वंचितकडून प्रा. नागोराव पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ओबीसी चेहरा असलेल्या पांचाळ हे प्राध्यापक आणि शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत असल्याने विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे सदस्य सतिश चव्हाण यांना मोठे आव्हान देण्याची शक्यता आहे.

नागपूरात दलित, मागास मतांचे होणार विभाजन

नागपूर पदवीधर मतदार संघातही वंचितने तीन उमेवार उभे केले आहेत. यात राहुल वानखेडे, रामराव चव्हाण आणि धर्मेश फुसाते यांचा समावेश आहे. याच मतदार संघात वंचितसोबत बहुजन समाज पार्टी, लोकभारती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, इंडियन हुमन राईट पार्टी, हिंदूस्थान जनता पार्टीचे उमेदवार आहेत. काँग्रेसने येथे अभिजित वंजारी तर भाजपने संदीप जोशी यांना मैदानात उभे केले आहे.

पुण्यातही वंचित देणार आव्हान

पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसने जयंत आसगावकर यांचे नाव जाहीर केले असले तरी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्याने शिक्षक परिषदेचे जुने कार्यकर्ते पवार यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. तर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी अनेकदा राष्ट्रवादीकडून आपल्याला पाठिंबा मिळविण्याच्या नादात काँग्रेसला डावलल्याने त्यांच्या विरोधात काँग्रेसने जयंत आसगावकर यांना उभे केल्याने या ठिकाणी वंचित फॅक्टर चालल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. पदवीधरमधून राष्ट्रवादीने अरूण लाड यांना उमेदवारी दिली असली तरी शिवसेनेही येथे आदित्य बोरगे यांना उभे केले आहे. यामुळे उद्या कोणते उमेदवार आपला अर्ज मागे घेतात, यावरून सर्वच मतदार संघातील लढत स्पष्ट होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.