- मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री यांना 100 कोटी रुपयांचे महिना टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी केला आहे.
सविस्तर वाचा- गृहमंत्र्यांनी दिले होते 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट , परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार?
- मुंबई - राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षांबाबत पालकांच्या मनात संभ्रमावस्था होती. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत, अशी महत्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. परीक्षा कालावधीत प्रवासाची अडचण होऊ नये, यासाठी रेल्वेला विनंती केल्याचेही त्या म्हणाल्या.
सविस्तर वाचा- दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच.. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास अधिकचा वेळ
- मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. तपास एनआयएकडे सोपवल्याने सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. अँटिलिया कारमध्ये स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून आता या प्रकरणाचा तपासदेखील एनआयए करणार आहे.
सविस्तर वाचा- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे
- मुंबई - उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास उपक्रमाचे प्रदर्शन खुले करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे कौशल्य मंत्री नवाब मलिक यांनी हस्ते शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, विकास, रोजगार निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात राज्यात ३२ आयटीआयची निवड केली आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगारीची संधी उपलब्ध होईल, अशी माहिती कौशल्य विकासाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
सविस्तर वाचा- विकास, रोजगार निर्मितीसाठी राज्यातील ३२ आयटीआयची निवड
- मुंबई - नवे पोलीसआयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण कशा पद्धतीने करता येईल याकडे भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शनिवारी मुंबई शहर तसेच उपनगरातील सर्व पोलीसठाण्यांमध्ये सकाळी दहा ते दुपारी 1 च्या दरम्यान तक्रार निवारण केंद्र उभारण्यात येणार आहेत. मुलुंड पोलीस ठाण्यात देखील परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारदार यांच्या तक्रारी ऐकण्यात आल्या.
सविस्तर वाचा- तक्रारदारांचे तक्रार सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण केंद्र
- नवी दिल्ली - पाकिस्तानच्या आणि चीनच्या आडमुठीपणामुळे भारताने आता सीमेवरील आपली बाजू बळकट करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय लष्काराची आणखी ताकद वाढणार आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने आज भारत डायनामिक्स लिमिटेडसोबत 1,188 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
सविस्तर वाचा- 'मिलान 2' टी क्षेपणास्त्र लष्कराला बळकट करणार, बीडीएलसोबत संरक्षण मंत्रालयाचा करार
- मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो-1 ची दररोजची प्रवासी संख्या 1 लाख 10 हजारावर पोहचली आहे. आता मेट्रोच्या प्रवाशांचे गर्दीचे विभाजन करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने सोमवारपासून 256 ऐवजी आता 280 मेट्रो फेऱ्या दररोज धावणार आहेत, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
सविस्तर वाचा- मेट्रोची प्रवासी संख्या पोहोचली एक लाख १० हजारांवर, सोमवारपासून दररोज धावणार 280 फेऱ्या
- गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - दिल्ली-लखनऊ शताब्दी रेल्वेतील एका बोगीत आग लागल्याची घटना घडली. ही घटना गाझियाबाद रेल्वे स्थानकावर घडली.
सविस्तर वाचा- दिल्ली-लखनऊ शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग; सर्व प्रवाशी सुरक्षित
- मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची सोशल मीडियावर खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि ती त्यावर खूप सक्रिय असते. ती एक सोशल मीडिया स्टार देखील आहे. तिची प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्ट वेगाने व्हायरल होत असतात. ती अनेकदा तिची जबरदस्त आकर्षक आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच तिने फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
सविस्तर वाचा- सारा अली खानचा लग्नाचा प्रस्ताव, शेअर केले 'वधू'च्या पेहराव्यातील फोटो
- अहमदाबाद - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा निर्णायक सामना होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार आहे.
सविस्तर वाचा- Ind vs Eng ५th t२० : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय; विराट रोहितसोबत सलामीला येणार