मोदी करणार आज 'मन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन की बात' हा कार्यक्रम होणार आहे. मोदींचा हा 77 वा कार्यक्रम असणार आहे.
नाना पटोले यांची मोदी सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद
मोदी सरकारला दुसऱ्यांदा सत्तेत येऊन २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मोदी सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते मोदी सरकारच्या कामगिरीवर काय बोलतात? याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या कार्यकाळाचा 7 वा वर्धपान दिन साधेपणाने साजरा केला जात आहे.
आजपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील अनेक जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावली. त्यात आजपासून पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. सांगली, बीड, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पुढील लॉकडाऊनबाबत आज निर्णय होणार
महाराष्ट्रातील लॉकडाऊन सर्सास शिथिल करता येणार नाही. त्यामुळे हळू हळू नियम शिथिल केले जातील, असे राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पुढील लॉकडाऊनबाबतचा निर्णय आज येण्याची शक्यता आहे.
परेश रावल यांचा आज वाढदिवस
अभिनेते परेश रावल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत. चित्रपटातून तीन दशके अनेक भूमिका केल्यानंतर परेश रावल भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले. २०१४ च्या निवडणुकीत अहमदाबाद पूर्व येथून लोकसभेकरिता उमेदवारी मिळाली आणि ते निवडणुकीत खासदार झाले.
किर्ती कुल्हारीचा आज वाढदिवस
अभिनेत्री किर्ती कुल्हारीचा आज वाढदिवस आहे. तिने उरी द सर्जीकल स्ट्राईक, ब्लॅकमेल, इंदू सरकार यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. क्रिमिनल जस्टीस या वेब सीरिजमध्येही किर्तीने उत्तम भूमिका केली आहे.