मुंबई - मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यांपासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्णसंख्या 409पर्यंत खाली आली होती. तर गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. दरम्यान, आज मुंबईत 1074 रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -
मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 1074 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 80 हजार 811वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 756वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 313 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 54 हजार 465वर गेला आहे. सध्या मुंबईत 12 हजार 588 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 195 दिवसांवर -
मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 195 दिवस, तर सरासरी दर 0.36 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 407 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 790 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 18 लाख 54 हजार 223 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२
२२ नोव्हेंबर - ११३५
२३ नोव्हेंबर - ८००
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण