पुणे - आठ दिवसांची परिस्थिती बघून लोकलबाबत निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार म्हणाले. निर्बंध शिथिल करताच संख्या वाढू लागली आहे. कालची संख्या आणि डिस्चार्ज यात फरक आला आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
मंत्री विजय वडेट्टीवार यांची पश्चिम महाराष्ट्रातील निवडक ओबीसी नेत्यांसोबत बैठक
16:39 June 13
परिस्थिती बघून लोकलबाबत निर्णय घेऊ - वडेट्टीवार
16:35 June 13
लोणावळातील शिबिरात सर्व पक्षांच्या लोकांना दालन खुली - वडेट्टीवार
पुणे - लोणावळा येथे होणाऱ्या शिबिरात मी नेता म्हणून जाणार आहे, असे म्हणत वडेट्टीवार पुणे म्हणाले,
- तिथे सर्व पक्षाच्या लोकांना दालन खुली आहे.
- राजकीय फायदा उठवण्यासाठी कुणीही प्रयत्न करू नये.
- आरक्षण रद्द झाले याला राज्य जबाबदार नाही.
- भाजप काळात काही निवडणुका रद्द झाल्या त्याचे काय कारण होते?
- दोन्ही ठिकाणी भाजप सरकार होते, प्रश्न सोडवले नाही.
- इम्पेरियल डेटा केंद्र देत नाही, त्यांना काय भीती कळत नाही.
16:33 June 13
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षण वाढवावे लागेल - वडेट्टीवार
पुणे - मराठा आरक्षणावर वडेट्टीवार म्हणाले,
- मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षण वाढवावे लागेल.
- त्यासाठी केंद्राने घटनादुरुस्ती करावी.
- मी मंत्री असलो तरी माझी मागणी आहे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे.
- ही जनगणना झाली तर ओबीसीचे प्रश्न सुटतील.
16:28 June 13
जातनिहाय जनगणनेचा डेटा जमा झाला आहे - वडेट्टीवार
पुणे - वडेट्टीवार यांनी जातनिहाय डेटावर भाष्य केले. ते म्हणाले,
- देशभर जातनिहाय जनगणनेचा डेटा जमा झाला आहे.
- राज्यात तो डेटा उपलब्ध करून घ्यावा यासाठी काँग्रेस पक्षातीलच विरोध नव्हता, इतर सर्व पक्षांनी केला.
- भाजपच्या नेत्यांनी पण त्याला विरोध केला.
- पण हा इम्पेरियल डेटा कलेक्ट करण्यासाठी चर्चा करू, निर्णय घेऊ.
- स्वतंत्र आयोग करायचा का ? याबाबत विचार करू.
- पन्नास टक्यातून SC, ST चे आरक्षण झाल्यावर उर्वरित आरक्षण हे ओबीसीलाच मिळाले पाहिजे.
- इम्पेरियल डेटा आला तरी ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही.
15:18 June 13
लोणावळात ओबीसीची दिशा ठरवली जाणार - वडेट्टीवार
पुणे - २६ आणि २७ जून या दिवशी ओबीसी नेत्यांचे लोणावळा येथे शिबीर होणार आहे. यावर वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पक्ष सोडून लोक तिथे उपस्थित असतील. तिथेच ओबीसीची वाटचाल आणि दिशा ठरवली जाणार. महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्र येत आहे, याचा अभिमान आहे. कुठल्याही पक्षाशी, समजाशी आणि संघटनेच्या विरोधात नाही. ओबीसी चळवळीमध्ये जे लोक काम करत आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
15:00 June 13
पश्चिम महाराष्ट्रातील निवडक ओबीसी नेत्यांसोबत बैठक
पुणे - मंत्री विजय वडेट्टीवार पश्चिम महाराष्ट्रातील निवडक ओबीसी नेत्यांशी बैठक पार पडली. बैठकीत ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर अनेकांची मतमतांतरे होती. त्यामुळे, अनेक चर्चांना उधाण आले होते. पुढील ओबीसीच्या न्याय हक्कासाठी, वाटचालीसाठी बैठकीत ठिकाणी चर्चा झाली. २६ आणि २७ जून या दिवशी ओबीसी नेत्यांचे लोणावळा येथे शिबीर होणार आहे.
11:57 June 13
मराठा युवा संघाचे नक्षलवाद्यांना उत्तर
नागपूर - मराठा युवा संघाचे नक्षलवाद्यांना उत्तर
- देशद्रोही लोकांनी मराठा समाजाची काळजी करू नये
- जे लोकशाही ला मानत नाही त्यांची आम्हाला गरज नाही
- आधी त्यांनी शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण करावं
- मग आम्ही त्यांच्या पाठिंब्याचा विचार करू
- मराठा समाज हा लोकशाहीला मानणारा असून शांततेच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला सल्ला देऊ नये - मराठा युवा संघ
09:54 June 13
सांगली - केरळ येथील 100 किलो सोने तस्करी प्रकरणी सांगली जिल्ह्यात एनआयएच्या पथकाकडून छापे
- आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात एनआयच्या पथकाकडून तपास सुरू
- दुबईमधून केरळमार्गे 100 किलो सोन्याच्या तस्करी करताना जुलै 2020मध्ये करण्यात आली होती कारवाई
09:54 June 13
मुंबईच्या कुर्ला येथील नाल्यांची सफाई व्यवस्थित न झाल्याने नाराज शिवसेना आमदार दिलीप पांडे यांनी कॉन्ट्रैक्टरला कचऱ्यात बसवले. तसेच नाल्यातून काढलेल्या कचऱ्याने अंघोळ घातली.
09:36 June 13
देशातील कोरोनाची सद्यस्थिती -
एकूण रुग्णसंख्या - 2,94,39,989
एकूण बरे झालेले रुग्ण - 2,80,43,446
एकूण मृत्यू - 3,70,384
एकूण सक्रिय रुग्णसंख्या - 10,26,159
एकूण लसीकरण - 25,31,95,048
09:33 June 13
देशात मागील 24 तासांत 80,834 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 1,32,062 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3,303 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
08:25 June 13
संजय राऊत खान्देशच्या दौऱ्यावर आहेत. आज (रविवारी) ते नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात येऊन येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी बैठक घेणार आहेत. याबाबतची माहिती नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
06:15 June 13
तेलंगणा काँग्रेसचे नवे प्रमुख ठरविण्याकरिता निरीक्षक पाठवण्याचे आवाहन
राज्यसभेचे माजी खासदार आणि तेलंगणा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंता राव यांनी सोनिया गांधींना तेलंगणा कॉंग्रेसचे नवे प्रमुख ठरविण्याकरिता ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे निरीक्षक पाठवण्याचे आवाहन केले.

TAGGED:
TODAYS BIG BREAKING