नवी मुंबई : भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. रोज उठल्यानंतर आज काय भाजी करायची, हा गृहीणींसमोरचा महत्त्वाचा प्रश्न असतो. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे शेवगा व तोंडलीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे, आज इतर सर्व भाज्यांचे कमी झालेले व स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढील प्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४४०० रुपये ते ४८०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७५० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १७५० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये आहे.
फळभाज्यांचे दर : गाजर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३२०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ५७५० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२५० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २०५०रुपये
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये
हेही वाचा : Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये सर्व भाज्यांचे दर काय आहेत? घ्या जाणून