मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 925 रुग्ण(today new corona cases) आढळून आले असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 945 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
12,290 सक्रिय रुग्ण -
हेही वाचा - मुंबईकरांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट BMC आज पूर्ण करणार
आज राज्यात 925 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 22 हजार 345 वर पोहचला आहे. तर आज 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 516 वर पोहचला आहे. आज 945 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 65 हजार 893 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 37 लाख 47 हजार 431 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.39 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 70 हजार 033 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 12 हजार 290 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्णसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925 रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यू संख्येत चढ उतार -
तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41 मृत्यूंची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
बई महापालिका - 257
अहमदनगर - 49
पुणे - 96
पुणे पालिका - 94
हेही वाचा - लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन नाही; ठाणे पालिकेचा निर्णय