मुंबई - मुंबईत आज रेल्वे प्रशासनाकडून आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. वांद्रेजवळील पादचारी पुलाचे गर्डर पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेने अप जलद मार्ग आणि अप-डाऊन हार्बर मार्गावर ५ तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. कल्याण-ठाणे आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल १० ते २० मिनिटे उशीराने धावतील.
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकावरील अप जलद आणि अप-डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ११ ते रविवार पहाटे पाच वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील अंधेरी ते सीएसएमटी फेऱ्या रद्द करण्यात आले आहे. अप जलद मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या सांताक्रुझ आणि माहीम स्थानकादरम्यान कमी वेगाने धावणार आहेत.
सीएसएमटीहून अंधेरीकडे जाणारी शेवटची डाऊन लोकल ही रात्री १०.१२ ला असणार आहे. तर अंधेरीहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची अप लोकल रा. १०.३८ धावणार आहे.
वसई रोड ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग शनिवार रात्री १२.३० ते रविवार दुपारी ४ पर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान मार्गावरी अप जलद गाड्या सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे अप लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे आणि डाऊन लोकल फेऱ्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मुंबईत येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस सुमारे ३० मिनिटे उशिरा धावतील.
हार्बर मार्गावरील वडाळा रोड-मानखुर्द दरम्यान मार्गावरील अप आणि डाऊन हे सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत असणार आहे. या ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आले आहे. पनवेल-मानखुर्द स्थानकादरम्यान विशेष लोकल आहे. हार्बर प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत मध्य आणि ट्रान्सहार्बरवरून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.