मुंबई : आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आज (21 नोव्हेंबर) या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस (Maharashtra Rajya Hutatma Smruti Din 2022) आहे. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस (21 November Maharashtra Rajya Hutatma Smruti Din) आहे.
स्मरणाचा आजचा दिवस : संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे 1960 दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून साजरा केला जातो. तर 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन (Maharashtra Rajya Hutatma Smruti Din) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या 107 जणांच्या स्मरणाचा आजचा दिवस आहे.
का साजरा केला जातो? 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वात आले. पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी सरकारकडे मागणी करून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली हुतात्मा स्मारकाची उभारणी (Hutatma Smruti Din 2022) झाली.
हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास : राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचे सांगितल्याने महाराष्ट्रात असंतोष होता. मात्र सामान्यांना, महाराष्ट्रातील जनतेला मुंबईसह महाराष्ट्र हवा होता. 21 नोव्हेंबर 1956 दिवशी फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये या मागणीसाठी विशाल मोर्चा निघाला होता. फोर्ट भागात त्या वेळेस संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोकं जमल्याने सत्याग्रहींवर लाठीमार करण्यात आला होता. फ्लोरा फ्लाऊंटन परिसरात गोळीबार झाला आणि 107 जणांचे जीव (Maharashtra Rajya Hutatma Smruti Din history) गेले. त्यामुळे हुतात्मा स्मृती दिन साजरा केला जातो.