ETV Bharat / state

Breaking News Live : गायक दलेर मेहंदीला मिळाला जामीन - आजच्या लेटेस्ट न्यूज

breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Sep 15, 2022, 6:38 AM IST

Updated : Sep 15, 2022, 8:16 PM IST

19:56 September 15

गायक दलेर मेहंदीला मिळाला जामीन

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने 2003 च्या मानवी तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदीला जामीन दिला आहे.

19:40 September 15

सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयने गोवा पोलिसांच्या ताब्यातून घेतले!

सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयने गोवा पोलिसांकडून ताब्यात घेतले. सीबआयने गुन्हा नोंदविल्याचे सीबीआय सूत्राने सांगितले.

19:29 September 15

प्रसिद्ध टेनिस खेळाडू रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा; 'ही' स्पर्धा असेल अंतिम

प्रसिद्ध टेनिस खेळाडू रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याची अंतिम एटीपी स्पर्धा असणार आहे. 41 वर्षीय रॉजरने ट्विटरवर आपला निर्णय जाहीर केला आहे.

18:57 September 15

आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेत्री नोरा फतेहीची तब्बल पाच तास चौकशी

नवी दिल्ली - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची बुधवारी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गुरूवारी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला चौकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणात नोराची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर ती EOW कार्यालयातून बाहेर पडली.

17:52 September 15

युट्युबरला सहा महिन्यांचा कारावास, मद्रास उच्च न्यायालयाची शिक्षा

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने YouTuber सावुक्कू शंकर यांना उच्च न्यायव्यवस्थेच्या विरोधात कथित वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल सहा महिने तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायव्यवस्थेविरोधात अवमान केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

17:23 September 15

तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग प्रकरणी मुस्लिम धर्मगुरुला अटक

रायगड - कर्जतमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी एका मुस्लिम धर्मगुरूला अटक केली आहे. 13 सप्टेंबर रोजी एका 11 वर्षीय मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर धर्मगुरुला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

16:39 September 15

मुंबईतील कूपर हॉस्पिटलच्या गोदामाला आग; कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईतील कूपर हॉस्पिटलच्या गोदामाला आज गुरुवारी आग लागली. ही आग सध्या आटोक्यात आली असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अग्नीशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

15:33 September 15

वेदांता महाराष्ट्राबाहेर जाणं दुर्दैवीच, ठाकरे सरकारवर खापर फोडू नका - शरद पवार

पुणे - राज्यात वेदांता प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यात आज गुरुवारी राष्ट्रवादीकडून मुंबई आणि पुण्यात आंदोलन करण्यात आले. यात राज्य सरकारविरोधात जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होतं. हे दुर्दैवी आहे. वेदांत प्रकल्प आता महाराष्ट्रात येणं शक्य नाही. ठाकरे सरकार याचं खापर फोडणं अयोग्य आहे. मंत्री आता सांगतायत की आम्ही यापेक्षा मोठा प्रकल्प आणू. हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

15:24 September 15

दिल्लीतील बिगर भाजप सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू- शरद पवार

पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू आहे. दिल्लीतील बिगर भाजप सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.

13:46 September 15

सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी कारवाईचे निर्देश:-संजय राठोड

नागपूर - काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठ्याप्रमाणात बनावट पनीर जप्त करण्यात आले होते,त्या पार्श्वभूमीवर अश्या घटना रोखण्यासाठी कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. पुढील काळ हा सणासुदीचा आहे. या काळात भेसळयुक्त पदार्थ विक्रीच्या धंद्यांना उत येत असल्याने खबरदारीचा उपाय म्ह्णून अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. एवढंच नाही तर दूध,तेल,पनीर सारख्या पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

13:26 September 15

राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा

मुंबई - राज ठाकरे यांचा 17 सप्टेंबर पासून विदर्भ दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात नवीन डबे जोडले जातील, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मात्र राज ठाकरे हे नवे जोडवे जोडण्यात यशस्वी होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली या शास्त्रक्रियेनंतर आता राजकीय शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी इतिहास 17 सप्टेंबर पासून विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे.

12:37 September 15

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट

वेदांताबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नारायण राणे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता

महाराष्ट्रात वेदांतावरून रणकंदन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतली भेट

12:02 September 15

वेदांत प्रकल्प वाद प्रकरणी युवासेना आक्रमक; चर्चगेट रेल्वे स्टेशन बाहेर स्वाक्षरी मोहीम

मुंबई - वेदांत कंपनीचा १.४५ लाख कोटींचा, महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या खोके सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी युवासेना कुलाबा विधानसभा तर्फे स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

11:54 September 15

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प वाद प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे - वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.

11:00 September 15

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीची नोटीस, आज होणार चौकशी

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलीन (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची ( Inquisition of Nora Fatehi ) चौकशी होणार आहे. ईडी नोरा फतेहीची सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही आज सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहे. याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता.

10:24 September 15

कोयना धरणाचे सहा दरवाजे साडे तीन फुटांनी उघडले, ३२,५८१ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुट 6 इंचाने उघडण्यात आले आहेत. धरणात प्रतिसेकंद ३३,६०७ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी ३२,५८१ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

10:24 September 15

पितृ पक्षचा सहावा दिवस

गया - पितृ पक्षांतर्गत गयामध्ये पिंड दानाचा आज सहावा दिवस आहे. पिंड दानाच्या सहाव्या दिवशी, विष्णूपद गर्भगृहाशेजारी असलेल्या 16 पिंडवेड्यांवर जल अर्पण करण्याचा नियम आहे. सलग तीन दिवस सर्व पिंडवेदींवर एक एक करून पिंडदान केले जाते. या पिंडवेड्या खांबांच्या स्वरूपात आहेत. यामागे पौराणिक कथेचे महत्त्व Importance of Pindadaan आहे. गया येथील विष्णुपद मंदिरात असलेल्या देवस्थानात श्राद्ध करतात. सहाव्या दिवशी फाल्गु नदीत स्नान करून मार्कंडेय महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर विष्णुपदात असलेल्या सोळा वेद्यांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथे आल्यावर विष्णूसह इतर देवांचे स्मरण करावे, ज्यांच्या नावाने वेद्या आहेत. त्यानंतर पिंडदानाचा विधी सुरू Pitru Paksha to worship ancestors करावा.

09:34 September 15

महाराष्ट्रात लवकरच नवा प्रकल्प; वेदांता ग्रुपच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

मुंबई - राज्यातील वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून राजकारण तापले असतानाच वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी लवकरच नवा प्रकल्प आणणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच जुलै महिन्यांत महाराष्ट्र सरकारने खुप प्रयत्न केल्याचे ट्वीटवरुन स्पष्ट केले आहे.

09:34 September 15

यवतमाळच्या मुख्य पोलीस हेडकॉटरवर पोलिसाची हत्या, दोन मारेकरी गजाआड

यवतमाळ : जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केला. यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले असता अनोळखी मारेकरी अचानक पोलिस मुख्यालय गेट जवळ आले आणि खून केला.

08:57 September 15

26 सप्टेंबरपासून सप्तशृंगी मातेचे भाविकांना घेता येणार दर्शन

नाशिक - सप्तशृंगी निवासिनी तसेच लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या सप्तशृंगी देवीचे नवरूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून म्हणजे (दि.26 सप्टेंबर) पासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

08:06 September 15

१३ वर्षीय अपंग आणि मतिमंद मुलीवर बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल

इंदापूर : एका अल्पवयीन १३ वर्षाच्या मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी अमोल कुचेकर (वय २५,रा–चिखली फाटा लासुर्णे), अनिल नलवडे, नाना बगाडे (रा.दोघे,गोतोंडी) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

08:04 September 15

इंदापूरातील युवा किर्तनकाराच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

इंदापूर - येथील किर्तनकारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका पोलीस शिपायासह त्याच्या अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय मोरे असे आत्महत्या केलेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. संजय मोरेंनी 10 सप्टेंबरला राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महादेव जाधव आणि त्याच्या एका अनोळखी मित्रावर मयताच्या बहिनेने तक्रार दिली होती. यावरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

07:27 September 15

येस बँक घोटाळ्यातील आरोपीला जामीन मिळाल्यानंतरही लुक आऊट नोटीस

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनतर सत्र न्यायालयाकडून रितसर जामीन मंजूर करण्यात आलेला असतानाही आरोपीविरोधात लुक आऊट नोटीस काढणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना उच्च न्यायालयाने चांगलंच धारेवर धरलं. कोणत्या कायद्याअंतर्गत तपास यंत्रणांनी ही नोटीस बजावली? असा थेट सवाल करत सीबीआय आणि ईडी संसदेच्या वरचढ आहेत का? असा सवाल न्या. अजय गडकरी व न्या. मिलिंद गडकरी यांच्या खंडपीठाने सीबीआय व ईडीला केला.

07:27 September 15

वडाळ्यात खळबळ! शेल्टर डॉन बॉस्को येथे 14 वर्षे मुलाने शौचालयात गळफास घेऊन केली आत्महत्या

मुंबई : वडाळा पश्चिम येथील शेल्टर डॉन बॉस्को उमेश बापू चव्हाण वय 14 वर्षे याने शौचलायात गळफास लावून आत्महत्या केली. यप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

07:16 September 15

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेश दौऱ्यावर होणार रवाना.. पुतीन, जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता

नवी दिल्ली: PM Narendra Modi in SCO Summit 2022 समरकंद, ताश्कंद येथे आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट 2022 मध्ये sco samarkand summit 2022 सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत. तेथे ते रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे राष्ट्राध्यक्ष, पाकिस्तानचे पंतप्रधान यांना भेटू शकतात. Shanghai Cooperation Organization Summit 2022

07:14 September 15

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह घेणार बाहुबली स्टार प्रभासची भेट

हैदराबाद (तेलंगणा) : Rajnath Singh To Meet Prabhas संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Union Minister Rajnath Singh हे ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णम राजू यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. राजू यांचे नुकतेच निधन झाले krishnam rajus demise आहे. 16 सप्टेंबर रोजी राजू यांच्या शोक सभेलाही सिंह उपस्थित राहणार आहेत.

07:14 September 15

CUET UG परीक्षा 2022 चा आज निकाल

नवी दिल्ली: ज्या विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CUET UG 2022 ची परीक्षा दिली आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट 2022 चा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे. ही परीक्षा ३० ऑगस्ट रोजी झाली होती. विशेष म्हणजे DU प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत पहिल्यांदाच 14 लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते.

06:51 September 15

देवाकडे जाऊन कौल घेतला आणि देवाने आम्हाला भाजपात जायला सांगितलं - दिगंबर कामत

पणजी - विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मंदिर चर्च व मशिदीत जाऊन निवडून आल्यानंतर पक्ष सोडणार नसल्याचे शपथ घेतली होती. पुढे काँग्रेसने आमदार फुटू नये म्हणून काहीकाळ निवडून आलेल्या आमदारांना अज्ञातवासामध्ये देखील नेऊन ठेवलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुका होऊन अवघे सहा महिने उलटताच या सर्व आमदारांपैकी आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. मात्र. आज या आमदारांना या शपथबद्दल विचारले असता आम्ही देवाकडे जाऊन कौल घेतला आणि देवाने आम्हाला भाजपा पक्षात जायला सांगितलं असं गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपात प्रवेश केलेले काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांनी सांगितलं.

06:28 September 15

Maharashtra Breaking News

नागपूर : दिल्लीतील नेत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे नेते राज्य लुटत आहेत आणि गुजरातला देत आहेत. गेलेल्या कंपनीने 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असेल. त्यांनी मुंबईही गुजरातला दिली तर आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

Last Updated : Sep 15, 2022, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.