ETV Bharat / state

काँग्रेसच्या गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण की बाळासाहेब थोरात? - sanjeev bhagwat

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते आणि गटनेतेपदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर आज काँग्रेसकडून सायंकाळी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून विधानसभेसाठी नवीन गटनेत्याची निवड केली जाणार आहे.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 20, 2019, 7:42 AM IST

मुंबई - राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते आणि गटनेतेपदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर आज काँग्रेसकडून विधानसभेसाठी नवीन गटनेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.

काँग्रेसची यासाठी महत्त्वाची बैठक आज सायंकाळी चार वाजता विधानसभा परिसरात होणार असून या बैठकीत काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने चार दिवसापूर्वीच आपल्या सर्व 42 आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत गटनेत्यांच्या संदर्भात राज्याचे प्रभारी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसकडून नियुक्त करण्यात आलेल्या गटनेत्याचे नाव आणि त्यासाठीचे पत्र सादर केले जाणार आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांच्या होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, लवकरच येत असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी एकाच्या गळ्यात विधानसभेच्या गटनेत्याची माळ टाकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे विधानसभेत 42 आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे 41 आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले असल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ 40 वर येऊन पोहोचली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आपल्या के. सी. पाडावी, कुणाल पाटील या दोन विद्यमान आमदारांना उभे केले आहे. यापैकी एकही ही उमेदवार लोकसभेत निवडून आल्यास काँग्रेसचेही संख्याबळ कमी होणार आहे. ही परिस्थीती लक्षात घेता विधानसभेचा गटनेता निवडण्यासाठीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक आमदारांचे मत विचारात घेतले जाण्याची शक्यता आहे. यासाठी गटनेत्यांच्या अंतिम निर्णयापूर्वी मल्लिकार्जुन खरगे हे स्वतंत्ररित्या आमदारांशी बोलणार असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेसच्या या गटनेत्यांच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच काँग्रेसमध्ये राहून स्वाभिमान पक्षाचा प्रचार करणारे आमदार नितेश राणे यांच्यासह निवडणुकीदरम्यान पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून कोणती कारवाई केली जाईल, यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत काँग्रेसकडून कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले जाते. मात्र, आमदारांनी त्यासाठी आग्रह धरल्यास काही थातूरमातूर नोटीस बजावल्या जातील, असेही बोलले जात आहे.

Intro:काँग्रेसच्या गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण की बाळासाहेब थोरातांची वर्णी?Body:काँग्रेसच्या गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण की बाळासाहेब थोरातांची वर्णी?

(यासाठी विधानसभेचे स्टॉक फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. १९ :

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते आणि गटनेतेपदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर उद्या (सोमवारी) २० मे रोजी काँग्रेसकडून विधानसभेसाठी नवीन गटनेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.
सोमवारी चार वाजता काँग्रेसची यासाठी महत्त्वाची बैठक विधानसभा परिसरात होणार असून या बैठकीत काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने चार दिवसापूर्वीच आपल्या सर्व 42 आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत गटनेत्यांच्या संदर्भात राज्याचे प्रभारी व व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसकडून नियुक्त करण्यात आलेल्या गटनेत्याचे नाव आणि त्यासाठीचे पत्र सादर केले जाणार आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांच्या होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये या गटनेते पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र लवकरच येत असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी एकाच्या गळ्यात विधानसभेच्या गटनेत्याची माळ टाकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे विधानसभेत 42 आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे 41आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले असल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ 40 वर येऊन पोहोचले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आपल्या के.सी. पाडावी, कुणाल पाटील या दोन विद्यमान आमदारांना उभे केले असून यापैकी एकही ही उमेदवार लोकसभेत निवडून आल्यास काँग्रेसचेही संख्याबळ कमी होणार आहे. ही परि्थिती लक्षात घेता विधानसभेचा गटनेता निवडण्यासाठीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक आमदारांचे मत विचारात घेतले जाण्याची शक्यता आहे. यासाठी गटनेत्यांच्या अंतिम निर्णयापूर्वी मल्लिकार्जुन खरगे हे स्वतंतररीत्या आमदारांशी बोलणार असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसच्या या गटनेत्यांच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच काँग्रेसमध्ये राहून स्वाभिमान पक्षाचा प्रचार करणारे आमदार नितेश राणे यांच्यासह निवडणुकीदरम्यान पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून कोणती कारवाई केली जाईल यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत काँग्रेसकडून कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले जाते. मात्र आमदारांनी त्यासाठी आग्रह धरल्यास काही थातूरमातूर नोटीस बजावल्या जातील असेही बोलले जात आहे.

Conclusion:काँग्रेसच्या गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण की बाळासाहेब थोरातांची वर्णी?
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.