मुंबई - मुंबईत कोरोनाचे सोमवारी (दि. 11 मे) नव्याने 791 रुग्ण आढळून आले आहेत तसेच 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 हजार 355 वर तर मृतांचा आकडा 528 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 3 हजार 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचे नव्याने 791 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 628 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 163 रुग्ण 8 व 9 मे रोजी खासगी रुग्णालयात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 20 जणांचा मृत्यू त्यापैकी 14 जणांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 11 पुरुष आणि 9 महिला रुग्ण होत्या. 20 मृतांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 10 जणांचे वय 60 वर्षांवर होते तर 8 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईतून आज 106 रुग्णांना ते बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत मुंबईमध्ये 3 हजार 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - 'मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी'