मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होताना दिसत आहे. आज 3 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले असून 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5 हजार 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवस -
मुंबईत आज 3 हजार 672 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 56 हजार 204 वर पोहोचला आहे. आज 79 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 330 वर पोहोचला आहे. 5 हजार 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 83 हजार 873 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 57 हजार 342 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 103 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 107 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 903 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 28 हजार 636 तर आतापर्यंत एकूण 54 लाख 90 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2 हजार 877, 19 मार्च 3 हजार 062, 20 मार्चला 2 हजार 982, 21 मार्चला 3 हजार 775, 22 मार्चला 3 हजार 260, 23 मार्चला 3 हजार 512, 24 मार्चला 5 हजार 185, 25 मार्चला 5 हजार 504, 26 मार्चला 5 हजार 513, 27 मार्चला 6 हजार 123, 28 मार्चला 6 हजार 923, 29 मार्चला 5 हजार 888, 30 मार्चला 4 हजार 758, 31 मार्चला 5 हजार 394, 1 एप्रिल 8 हजार 646, 2 एप्रिलला 8 हजार 832, 3 एप्रिलला 9 हजार 090, 4 एप्रिलला 11 हजार 163, 5 एप्रिलला 9 हजार 857, 6 एप्रिलला 10 हजार 030, 7 एप्रिलला 10 हजार 428, 8 एप्रिलला 8 हजार 938, 9 एप्रिलला 9 हजार 200, 10 एप्रिलला 9 हजार 327, 11 एप्रिलला 9 हजार 989, 12 एप्रिलला 6 हजार 905, 13 एप्रिलला 7 हजार 898, 14 एप्रिलला 9 हजार 925, 15 एप्रिलला 8 हजार 217, 16 एप्रिलला 8 हजार 839, 17 एप्रिलला 8 हजार 834, 18 एप्रिलला 8 हजार 479, 19 एप्रिलला 7 हजार 381, 20 एप्रिलला 7 हजार 214, 21 एप्रिलला 7 हजार 684, 22 एप्रिलला 7 हजार 410, 23 एप्रिलला 7 हजार 221, 24 एप्रिलला 5 हजार 888, 25 एप्रिलला 5 हजार 542, 26 एप्रिलला 3 हजार 876, 27 एप्रिलला 4 हजार 014, 28 एप्रिलला 4 हजार 966, 29 एप्रिलला 4 हजार 192, 30 एप्रिलला 3 हजार 925, 1 मे रोजी 3 हजार 908, 2 मे रोजी 3 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.