मुंबई : हॅलो! मी आयपीएस अधिकारी हनिफ शेख बोलतोय. बेळगावात एका कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात तुम्हीही सहभागी व्हा, तुमचे मानधन दिले जाईल अशी बतावणी करून अशोक निकाळजे या गायकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक (duped money of mumbai based singer) केली. त्या पैशांवर गोव्यात मौजमजा करणार्या यलप्पा वैजू कोलकर (३२) या भामट्याला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बेळगावचा असलेल्या यलप्पाने अशाप्रकारे अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती मिळत (Police Arrested Accused) आहे.
आर्थिक फसवणूक : ऑक्टोबर महिन्यात अशोक निकाळजे यांना एका व्यक्तीचा कॉल आला. समोर बोलणाऱ्या व्यक्तीने तो कर्नाटकातील आयपीएस अधिकारी हनिफ शेख असल्याची आपली ओळख सांगितली. आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला असून त्यात तुम्ही सहभागी व्हा, तुमचे मानधन देऊ असेही त्याने सांगितले. त्याचबरोबर कर्नाटकातील एक कलावंत प्रविण गस्ती याला देखील संपर्क साधून त्यालाही तुमच्यासोबत घेऊन या त्याचेही मानधन देऊ अशी बतावणी करत आयपीएस ओळख सांगणार्याने निकाळजे यांना प्रविण गस्तीचा नंबर दिला. त्यानंतर पाच लाख रुपये एनईएफटी केले असल्याचा मेसेज त्या अधिकार्याने निकाळजे यांना (tilak nagar police arrested accused) पाठवला.
मानधन द्या : दोन दिवसात पैसे गायकाच्या बँक खात्यात जमा होतील, असे त्याला वाटले. दरम्यान निकाळजे यांनी गस्तीला संपर्क साधल्यावर त्याने कार्यक्रमास येण्यास तयारी दर्शवली. मात्र, आधी माझे अर्धे मानधन द्या, अशी अट त्याने निकाळजेला घातली. एनईएफटी केलेले पैसे मिळणार आहेतच, या विश्वासावर निकाळजे यांनी गस्ती याने दिलेल्या दोन बँक खात्यावर आपल्याकडचे पैसे पाठवले. पहिल्या खात्यावर २५ हजार रुपये दोन वेळा फोन पेद्वारे पाठवले. तसेच आपल्या बँक खात्यातून दोन लाखाची रोकड गस्तीने दिलेल्या दुसर्या बँक खात्यावर पाठवली. पैसे मिळाल्यानंतर आयपीएस सांगणार्या हनिफने निकाळजे यांना टाळण्यास सुरूवात केली.
फसवणूक झाल्याचे समजले : हा सर्व प्रकार निकाळजे यांनी त्यांच्या एका सहकारी महिलेला सांगितली.असे कुठलेही कार्यक्रम होत नसतात तुझी फसवणूक झाल्याचे महिला कलावंताने सांगितल्यानंतर अशोक निकाळजे यांनी टिळक नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदिप पवार तसेच राहुल बनसोडे, नामदेव करांडे या पथकाने तपास चक्रे जोरदार (mumbai based singer) फिरवली.
भामट्याला हॉटेलात पकडले : पोलीसांनी बँक खात्यांचा अभ्यास केला असता, ती खाती गोव्यातील नागरिकांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संदिप पवार आणि पथकाने गोवा गाठलं. तेव्हा ज्या बँक खात्यावर दोन लाख पाठवले होते, ते खाते एका टॅक्सी चालकाचे निघाले. माझ्या सहकारी टॅक्सी चालकाने त्याच्या एका प्रवाशाच्या बँक खात्याची अडचण झाल्याने आमच्या खात्यावर पैसे मागवून घेतल्याचे चालकांकडून समजले. ती व्यक्ती कलाकार असून इव्हेंटवाल्यांना पैसे पाठवायचे असल्याने आमची बँक खाती दिल्याचे ते म्हणाले. मात्र तो अचानक बेपत्ता झाला. ना आमचे भाडे दिले, ना ज्या हॉटेलात थांबलेला तिकडचे बिल भरले, असे त्या टॅक्सी चालकांनी सांगितले. मग पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे यलप्पा या भामट्याला एका हॉटेलात पकडले. आयपीएस अधिकारी, प्रविण गस्ती आणि यलप्पा कोलकर या तिन्ही नावांचा एकच व्यक्ती असल्याचे आरोपीच्या अटकेनंतर स्पष्ट झाले. त्याच्याकडून दोन मोबाईल व दोन सीम कार्ड जप्त करण्यात आले.