मुंबई : विमानतळामधे प्रवेश करताना फ्लाइटचे तिकीट आणि बोर्डिंग पासची तपासनी केली जाते. सी आय एस एफ अधिकारी फ्लाइट तिकीट आणि बोर्डिंग पास मॅन्युअली तपासत असतात. या प्रकारात प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. गर्दी असेल तर अनेकवेळा रांगांमधे ताटकळत उभे रहावे लागते. प्रवाशांचा हा वेळ वाचवण्यासाठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दीनापासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 1 आणि 2 च्या प्रवेशद्वारांवर टूडी बारकोड रीडर लावण्यात आले आहेत. याद्वारे तिकीट पास स्कॅन केले जाणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते. तसेच याठिकाणी अनेक व्यापारी आणि औद्योगिक संस्थांची कार्यालये ऐतिहासिक इमारती तसेच चित्रपट श्रृष्टी आहे. यामुळे देश विदेशातील बिजनेसमन, पर्यटक नेते अभिनेते आदी प्रवासी विमानतळावरून ये जा करतात. यामुळे CSMIA मुंबई विमानतळावर सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सेवा वितरीत करण्यासाठी तसेच प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा देवून एक चांगला आनंददायी प्रवासी अनुभव देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. आपली क्षमता वाढवून उत्कृष्ट व्यवस्थापन निर्माण करून विमानतळावरील पायाभूत सुविधा विकसित करण्यात मुंबई विमानतळ आघाडीवर राहिले आहे.
वर्षाला ४८ दशलक्ष प्रवासी : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज ९०० हून अधिक विमान उड्डाण घेतात. रोज १ लाख ५० हजार तर वर्षाला ४८ दशलक्ष प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्नशील असते. दिवसाला लाखो प्रवाशांचे तिकीट आणि बोर्डिंग पास तपासावे लागतात. हे पास मॅन्युअली तपासण्यास लागणार वेळ कमी करण्यासाठी प्रवेशद्वारांवर 2D बारकोड रीडर लावण्यात आले आहेत. तिकीट आणि बोर्डिंग पास स्कॅन केले जाणार आहेत. यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
गेटवे टू गुडनेस : मुंबई विमानतळ येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी क्षमता वाढवून चांगले व्यवस्थापन निर्माण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते. प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावरील पायाभूत सुविधा विकसित करण्यात CSMIA आघाडीवर आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विमानतळ गेटवे टू गुडनेस बनले आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांची वाहतूक करणे विमानतळ प्रशासनाला सोपे जात आहे.
हेही वाचा : Deepak Kesarkar on Davos Tour : चार्टड फ्लाईटने जाण्यात गैर काय- दीपक केसरकर