ETV Bharat / state

राज्यात गेल्या २४ तासात तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू; मृतांचा आकडा ५४वर

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यभरात ५४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

maharashtra
राज्यात गेल्या २४ तासांत तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू
author img

By

Published : Jun 25, 2020, 2:46 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी रस्त्यावर पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, राज्य पोलीस दलात कोरोनाचा विळखा वाढत आहे. राज्य पोलीस दलात गेल्या २४ तासांत ३ कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा ५४ वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही ९९१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात १०६ पोलीस अधिकारी तर ८८५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आतापर्यंत राज्यात ३ पोलीस अधिकारी व ५१ पोलीस कर्मचारी अशा ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३५ हजार ४३१ गुन्हे नोंदविण्यात आले. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या ७४६ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत ८५८ जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संदर्भात तब्बल १ लाख ४ हजार ४९२ फोन पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या १,३३५ प्रकरणात २७,५६९ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ८४,४६१ वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल ८ कोटी ४१ लाख ३२ हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या ५६ घटना घडल्या असून ८६ पोलीस जखमी झाले आहेत. राज्यात सध्या एकूण १०९ रिलीफ कॅम्प आहेत. त्याठिकाणी जवळपास ३,५४८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वाधिक मृत्यू मुंबई पोलीस खात्यात -

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८ हजार ६१७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख ३१ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ३५ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३६ पोलिसांचा राज्यात सर्वाधिक मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.