ETV Bharat / state

Threatened Attack On Taj Hotel Arrested : ....म्हणून ताज हॉटेल उडवून देण्याची दिली धमकी; आरोपीला अटक - Santacruz Police In Mumbai

Threatened Attack On Taj Hotel Arrested : दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देवून जनमानसात दहशत पसरविणाऱ्या आरोपीस मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. जगदंबा प्रसाद सिंग (वय ३६) असे अटक आरोपीचे नाव आहे. ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची खोटी माहिती या आरोपीने दिली होती.

Threatened Attack On Taj Hotel Arrested
ताज हॉटेल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 8:50 AM IST

मुंबई : Threatened Attack On Taj Hotel Arrested : ३१ ऑगस्टला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police Control Room) मुख्य नियंत्रण कक्ष येथे एका मोबाईलवरून कॉल करण्यात आला होता. कॉलवरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव मुकेश सिंग असे सांगितले होते. तो गाझियाबाद उत्तर प्रदेश येथून बोलत असल्याची खोटी माहिती दिली होती. त्यांने सांगितले होते की, त्याच्या फेसबुक खात्यावर उर्दू भाषेत पोस्ट प्राप्त झाली की, दोन पाकिस्तानी नागरिक समुद्रामार्गे मुंबईत येवून ताज हॉटेल उडविणार (Taj Hotel Bomb Threat) आहेत. या कॉलरबाबत अधिक माहिती घेतली असता, तो मुंबई येथून बोलत (Fake Call Mumbai Police) असल्याचे पोलिसांना समजले.

खोटी माहिती देण्यामागचे कारण : केवळ नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती आरोपीने पोलिसांना कळवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यावरून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०५(१) (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

आरोपी सांताक्रूझ पोलिसांच्या ताब्यात : या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचा कक्ष ९ यांच्याकडून करण्यात येत होता. आरोपीने कॉल करण्यासाठी वापरलेल्या मोबाईलची माहिती काढण्यात आली. त्याद्वारे जगदंबा हा आरोपी सांताक्रूझ परिसरात असल्याचे समजले. त्यावरून सापळा रचून त्यास सांताक्रूझ परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून खोटी माहिती देण्याकरिता वापरलेला मोबाईल मिळून आला. त्यावरून हा गुन्हा याच आरोपीने केल्याची खात्री पटली. आरोपीने त्याचे नाव मुकेश सिंग असे सांगितले होते. सांगितलेले नाव खोटे असून, त्याचे जगदंबा प्रसाद सिंग (वय ३६ वर्षे) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून सांताक्रूझ येथे गोळीबार रोड परिसरात राहतो. या आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकरिता सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई : ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उपआयुक्त (प्र-१) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण- पश्चिम) महेश देसाई यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक, पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुनिल म्हाळसंक, पोलीस हवालदार राहुल पवार, पोलीस शिपाई वैभव पाटील, शार्दुल बनसोडे, सुशांत गवते, प्रशांत भुमकर यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : ताज हॉटेल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
  2. Mumbai Attack : 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर बनलेत अनेक चित्रपट, जाणून घ्या त्यातील काही निवडक चित्रपटांबद्दल
  3. Ashish Shelar On Govt : ताज हॉटेल शेजारील शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात - आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.