ETV Bharat / state

Mumbai High Alert : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी सज्ज - एनआयएकडून अलर्ट जारी

मुंबईवर दहशतवादी हल्लाच्या धमक्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यासंदर्भात एनआयएकडून अलर्ट जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संशयित इसमाला अटक करण्यात आली आहे. मात्र, धोका कायम असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय यंत्रणेने व्यक्त केली आहे. कारण सर्फराज मेनन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai High Alert
Mumbai High Alert
author img

By

Published : Feb 28, 2023, 4:22 PM IST

मुंबई : रविवारी, नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी (NIA ) ला एका अज्ञात ई-मेल आयडीद्वारे एक मेल प्राप्त झाला आहे. मेलमध्ये सरफराज मेमनचा उल्लेख आहे. त्याचे आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, रहिवासी प्रमाणपत्र यांसारखे सर्व तपशील जोडण्यात आले आहेत. नंतर डेंजर मॅनच्या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये एनआयएने तपास यंत्रणांना काही माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांसह अन्य तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. त्यानुसार मुंबई पोलीस आणि संवेदनशील भागात इतर तपास यंत्रणा मुंबईतील संशयितांवर करडी नजर ठेवून होती.

सर्फराज मेमनला पकडण्यात यश : मुंबई क्राइम ब्रँचचे क्राइम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) या प्रकरणाचा तपास करत असताना, सर्फराज मेमनचा शोध घेण्यासाठी सर्व स्थानिक पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएस आणि इतर शहर जिल्हा पोलिसांनाही सरफराजबद्दल माहिती देण्यात आली होती. जोपर्यंत व्यक्तीचा शोध लागत नाही तोपर्यंत सर्व शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले होते. अखेर सर्फराज मेमनला पकडण्यात महाराष्ट्र एटीएसच्या विशेष पथकाला यश आले.

मुंबई हाय अलर्ट : मुंबई पोलिसांच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बारा महिने हाय अलर्टवर असते. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटाच्या धमक्या येत आहेत. म्हणूनच NIN ने पाठवलेल्या संदेशांबाबत आम्ही सावध आहोत. मुंबई पोलीस संशयितांवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून मुंबईकर सज्ज झाले आहेत. मात्र, नागरिकांनी कोणतीही संशयित व्यक्ती, संशयास्पद क्रियाकलाप किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ मुंबई पोलिसांना कळवावे, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.

दहशतवादी हल्ल्याबाबत मेल: शुक्रवार 03 फेब्रुवारी रोजी एनआयएच्या ईमेल आयडीवर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मेल आला होता. या मेलनंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. इमेल आयडी तयार करण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर करण्याआधीही अनेक मेल आयडी तयार करण्यात आले होते. यापैकी एका मेल आयडीवरून रशियाहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला होता.

हेही वाचा - Maha Budget Session Live Updates: पत्रकार वारिसेंच्या हत्येप्रकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी चर्चा सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.