मुंबई: यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव टारफे, महाळुंगे शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना घोषित झाला आहे. (Format of National Teacher Award ) हा पुरस्कार सोहळा शिक्षक दिन निमित्ताने दिल्लीत 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने देशातील शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहे. (teacher Mrunal Ganjale)
या आधारावर मिळतो पुरस्कार: शिक्षकांना त्यांच्या शाळेतील वागणुकीमुळे तसेच इमाने-इतबारे नोकरी केल्यावर पुरस्कार दिला जातो. समाज आणि शासन त्यांचे नाव काढतो. केंद्र शासनाच्या साक्षरता विभागाचे सचिव प्राची पांडे यांनी राज्यातील अश्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची निवड जाहीर केली आहे. काल सायंकाळी उशिरा जाहीर करताना केंद्र शासनाने मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे.
निकषात शाळा आणि शिक्षिकेची झाली निवड: केंद्र शासनाच्या अनेक गाळण्या, चाचणी नंतर अशी निवड करत असते. ह्या पुरस्कारासाठी तीन टप्प्यात निवड प्रक्रिया शालेय शिक्षण विभाग अंतर्गत साक्षरता विभागाने राबवली. ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया केली गेली. शेकडो शिक्षकांपैकी जो शिक्षक किंवा शिक्षिका व्यक्ती निकष पूर्ण करतात अश्याच व्यक्तीला तो पुरस्कार दिला जातो. यंदा मृणाल गांजाळे ह्या शिक्षिकेची एकमेव शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांनी शाळा नावारूपाला: केंद्र शासनाच्या कठोर निकषात राज्यातील पुणे जिल्हा परिषदेचे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव टारफे, महाळुंगे ह्या शाळेचे शिक्षक मृणाल गांजाळे याची निवड केंद्र शासनाने केली आहे. त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत जे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला. शिकणे, शिकवणे ही आंतरक्रिया उत्कृष्टपणे अंमलात आणली. शिवाय व्यवस्थापन देखील उत्तमोत्तम केले. असलेल्या साधन स्रोतामधून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली. त्यामुळेच त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड केली गेली.
वंचितांच्या मुलांना शिकवणे हे आव्हानात्मक: अध्ययन, अध्यापन ह्या क्षेत्रात मृणाल ह्या शिक्षिकेने स्वतः नवीन तंत्र विकसित केले. अमूर्त संकल्पना बालकांना समजण्यास मोठा अडथळा असतो. ज्या समूहाला शेकडो वर्षे शिक्षणाचा हक्क नाकारला अश्या पालकांच्या पाल्यांना गणित सह पर्यावरण विज्ञान, भाषा, इतिहास हे विषय त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. अश्या अध्ययन प्रक्रिया तंत्राने समजावून सांगण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांकरवी करवून घेतला. असे करणे हे आव्हानात्मक काम असते. हे वेगळेपण त्यांच्या शिकवण्यातून ठसठशीतपणे समोर आले.
यंदा एकमेव शिक्षिकेला पुरस्कार: मात्र दरवर्षी एक पेक्षा अधिक पुरस्कार महाराष्ट्र राज्य मिळवीत असते. यंदा मात्र एकाच शिक्षिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुरस्कारामध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र, रोख 50,000 रुपये आणि रौप्य पदक देखील आहे. शिक्षक दिन निमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हॉटेल 'द अशोका' नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटना महाराष्ट्र नेते महेंद्र गणपुले यांनी दिली.