ETV Bharat / state

दिवाळीच्या काळात केवळ एका आठवड्यात राज्यातून सुमारे सव्वा चार कोटींचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते. तर याच वाढणाऱ्या विक्रीचा फायदा भेसळखोर घेताना दिसतात. त्यामुळेच दरवर्षी दिवाळीत अन्न भेसळ वाढते वा असुरक्षित अन्न पदार्थाची विक्री होते. असे अन्न पदार्थ खाणे शरीरास अपायकारक ठरते. तेव्हा या अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते.

adulterated-food-items
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Nov 12, 2020, 9:40 AM IST

मुंबई - दिवाळीला आता सुरुवात झाली असून घरोघरी फराळ बनवण्यात आले असतील वा काहीजण आता फराळ बनवायला घेतील. त्याचबरोबर मिठाईची खरेदीही आता जोमात सुरू होईल. पण नागरिकांनो, मिठाई मिठाईसाठीचा खवा-मावा तसेच अन्न पदार्थ, तयार फराळ खरेदी करताना जरा सावधान. कारण तुम्ही खरेदी करत असलेले हे पदार्थ भेसळयुक्त वा असुरक्षित असू शकतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही भेसळखोर सक्रिय झाल्याची बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे. एका आठवड्यात एफडीएने तब्बल सव्वा चार कोटीच्या अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. यात 12 टन खवा, 3561 किलो मिठाई, 46 हजार किलो रवा-मैदा-तेल-तूप तर 40 हजार 638 किलो इतर अन्न पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सुरक्षित साजरी करण्यासाठी अशी खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

एका आठवड्यात राज्यातून सुमारे सव्वा चार कोटींचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त
विशेष मोहीमेला सुरुवात -दिवाळी म्हणजे फराळ आणि मिठाई. दिवाळीत घरोघरी लाडू, करंजी, चकल्या, चिवडा असा फराळ बनतो. तर मिठाई ही तयार केली जाते. त्यात तयार मिठाई आणि तयार फराळ खरेदी करणाऱ्याची संख्या ही मोठी असते. एकूणच काय तर दिवाळीत खवय्येगिरी सुरू असते. या अनुषंगाने अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते. तर याच वाढणाऱ्या विक्रीचा फायदा भेसळखोर घेताना दिसतात. त्यामुळेच दरवर्षी दिवाळीत अन्न भेसळ वाढते वा असुरक्षित अन्न पदार्थाची विक्री होते. असे अन्न पदार्थ खाणे शरीरास अपायकारक ठरते. तेव्हा या अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते. त्यानुसार यंदाही राज्यभरात या विशेष तपासणी मोहिमेला सुरुवात झाली असून जोरात कारवाई सुरू असल्याची माहिती शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
adulterated-food-items
प्रतिकात्मक फोटो
'इतका' साठा जप्त -एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएकडून राज्यभर भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्न पदार्थांविरोधातील कारवाईने वेग घेतला आहे. त्यानुसार राज्यातून एका आठवड्यातच सव्वा चार कोटी रुपयांचा अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती केकरे यांनी दिली आहे. या कारवाईनुसार 62 ठिकाणी छापे टाकत 12 टन खवा-मावा जप्त करण्यात आला आहे. या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत 6 लाख 37 हजार 889 अशी आहे. मिठाईतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे खवा-मावा. त्यामुळे दिवाळीत सर्वात जास्त मागणी ही खवा-माव्यालाच असते. तर खवा-मावा हा शेजारच्या गुजरात, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येतो. तर परराज्यातून येणारा हा खवा-मावा सर्वाधिक असुरक्षित, भेसळयुक्त असतो. त्यामुळे खवा-मावाविरोधात या काळात जोरदार कारवाई होते.रवा, बेसन, तेल-तूप ही काळजी घेत करा खरेदी -खवा-माव्यानंतर तयार मिठाई आणि फराळासाठीच्या कच्च्या मालात अर्थात रवा, मैदा, बेसन, तेल-तूप, डाळी अन्य पदार्थांमध्येही मोठी भेसळ होते. त्यानुसार यंदाही मोठ्या संख्येने असे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या रवा, बेसन, मैदा, तेल-तूप अशा अन्नपदार्थांचा 46 हजार 504 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर 641 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. तर या साठ्याची एकूण किंमत 1 कोटी 87 लाख 45 हजार 918 इतकी आहे. महत्वाचे म्हणजे 641 पैकी 6 नमुने आतापर्यंत असुरक्षित आढळले आहेत. तर मिठाईचे ही 350 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून असुरक्षित आणि भेसळीचा अंदाज व्यक्त करत 3561 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. या मिठाईची किंमत 6 लाख 32 हजार 750 इतकी आहे. याव्यतिरिक्त मसाला, मीठ, साखर, चहा पावडर, जिरे-मिरे असे अन्य पदार्थ ही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. याचे तब्बल 1136 नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. तर 40 हजार 628 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत 2 कोटी 98 लाख आहे, असे केकरे यांनी सांगितले आहे.नागरिकांना 'एफडीए'चे 'हे' आवाहन -जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मात्र त्याचवेळी ही दिवाळी सुरक्षित दिवाळी म्हणून साजरी करण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखत आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केकरे यांनी केले आहे. एफडीए कारवाई करत आहेच पण नागरिकांनी मिठाई, खवा-मावा आणि इतर अन्न पदार्थ घेताना काळजी घ्यावी. नोंदणीकृत, परवानाधारक आणि ओळखीच्या विक्रेत्यांकडूनच ही खरेदी करा. तर खरेदी बिल घ्या. पाकिटावरील सर्व माहिती वाचून घ्या. मुख्य म्हणजे मुदत तपासून घ्या. मिठाई किती तासात खायची हे तपासून त्या वेळेतच मिठाईचे सेवन करा. रंग, चव, वास तापसुन मिठाई, खवा-मावा आणि इतर अन्न पदार्थ खरेदी करा. तर सर्वात महत्वाचे म्हणजे काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित एफडीएशी संपर्क करावा, असे आवाहन केकरे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.