ETV Bharat / state

Mumbai Crime : मोठी कारवाई! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने 30 कोटींचे कोकेन केले जप्त - कोकेन

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने लागोस येथून अदिस अबाबा मार्गे आलेल्या दोन नायजेरीयन प्रवाशांकडून तब्बल 30 कोटींचे कोकेन जप्त केले आहे. डीआरआयने जप्त केलेले कोकेन हे ड्रग्ज तब्बल 2.976 किलो असल्याचे सांगितले जात आहे.

30 Crores Cocain seized
जप्त केलेले कोकेन
author img

By

Published : Mar 7, 2023, 10:46 PM IST

मुंबई : सोने आणि अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी मुंबई विमानतळावर कस्टम आणि डीआरआयने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. अशाच प्रकारे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ही मोठी कारवाई मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली आहे. लागोस येथून अदिस अबाबा मार्गे आलेल्या दोन नायजेरीयन प्रवाशांकडून तब्बल 30 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन नायजेरियन व्यक्तींनी स्वतःच्या पोटात लपवून तीन किलो कोकेन हे ड्रग्स आणले होते.

30 कोटींचे कोकेन जप्त : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 30 कोटी रुपयांचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) ही मोठी कारवाई केली आहे. लागोस येथून अदिस अबाबा मार्गे आलेल्या दोन नायजेरीयन प्रवाशांच्या चेकिंगदरम्यान हे कोकेन आढळून आले आहे. डीआरआयने जप्त केलेले कोकेन हे ड्रग्ज तब्बल 2.976 किलो असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

167 कॅप्सुल जप्त : या कारवाईत तस्करांकडून विशेष म्हणजे या कोकेनची तस्करी पोटात लपवून करण्यात येत होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या या मोठ्या कारवाईत प्रवाशांकडून 167 कॅप्सुल जप्त करण्यात आल्या आहेत. अलीकडेच मुंबई विमानतळावर दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले होते. डीआरआयच्या गुप्तचर विभागाने कारवाई केली होती. मुंबई विमानतळावर त्यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्याकडून 4.54 कोटी रुपये किमतीचे सुमारे 8 किलो वजनाचे सोने पेस्ट स्वरूपात जप्त केले होते.

पाळत ठेवत केली कारवाई : महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) 17 जानेवारीला दुबईहून मुंबईला आलेल्या प्रवाशांकडून पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी होत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि विमानतळावर पथकाने त्यांना अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर पेस्ट स्वरूपात 8.230 किलो सोने सापडले होते. सोन्याची किंमत सुमारे 4.54 कोटी इतकी होती.

हेही वाचा : Brown Sugar Durg Seized : ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक, 25 लाखांचे ड्रग्ज जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.