ETV Bharat / state

INDIA Alliance Meeting Mumbai : इंडियाच्या आघाडीला शह देण्याकरिता एनडीएची मुंबईत बैठक सुरू - Rahul Gandhi in Mumbai

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 6:48 AM IST

Updated : Aug 31, 2023, 10:41 PM IST

22:40 August 31

इंडियाच्या आघाडीला शह देण्याकरिता एनडीएची मुंबईत बैठक सुरू

इंडियाच्या आघाडीला शह देण्यासाठी राज्यातील एनडीए घटक पक्षांची बैठक घेण्यात येत आहे. या 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील शिवसेना,भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख मंत्री आणि नेते उपस्थित आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे. राज्यात विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी नक्की काय रणनीती आखावी यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

22:12 August 31

संयोजक निवडीवर उद्या घोषणा होण्याची शक्यता-अनिल देशमुख

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर, दिल्ली आणि पंजाबमधील जागावाटपाचा मुद्दा उपस्थित केला, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आला. त्यावर केजरीवाल म्हणाले, संपूर्ण देशात, सर्वत्र जागा वाटप होणार आहे. तसे काम झालेच पाहिजे. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख म्हणाले, संयोजक निवडीवर चर्चा सुरू असल्याचं ऐकलं आहे. त्याबाबत उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत कदाचित घोषणा केली जाऊ शकते. लोगोही हवा होता. उद्या नाश्ता झाल्यावर पुन्हा एकदा मीटिंग आहे. दरम्यान, भारताच्या संविधानाची प्रत, राष्ट्रीय बोधचिन्ह आणि भारत मातेचे चित्र हे इंडिया आघाडीच्या बैठकीबाहेर ठेवण्यात आलं होते.

19:58 August 31

इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? ओमर अब्दुल्ला यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले, आम्हाला पंतप्रधानपदाचा कोणताही चेहरा जाहीर करण्याची आवश्यकता नाही. एकदा निवडणुका होऊ द्या. आम्हाला बहुमत मिळू द्या, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. ओमर अब्दुल्ला हे इंडियाच्या बैठकीकरिता मुंबईत आले आहेत.

19:35 August 31

इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू, भाजपाविरोधात काय आखणार रणनीती?

आगामी लोकसभेत भाजपाला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये सुरू आहे. यामध्ये भाजपाविरोधात रणनीती आणि अजेंड्यावर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आदी उपस्थित आहेत.

18:40 August 31

हेमंत सोरेन यांच्यासह अरविंद केजरीवाल मुंबईत दाखल, इंडियाच्या बैठकीसाठी नेत्यांची मांदियाळी

झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हेदेखील मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा हेदेखील मुंबईत आले आहेत.

17:36 August 31

पंतप्रधान मोदी हे एकाच व्यक्तीला पाठिशी का घालतात- राहुल गांधींची टीका

मुंबई राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अदानींच्या कथित घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी हे एकाच व्यक्तीला पाठिशी का घालतात? 100 कोटी डॉलर्स बाहेर गेले आणि परत आले. जेव्हा अदानी यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा मोदी हे उदास होतात. अदानींच्या संस्थेत सेबीचे माजी अध्यक्ष काम करतात, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. जी २० ची परिषद असताना पंतप्रधान यांच्यावर थेट आरोप होत आहेत. देशाच्या प्रतिमेला धक्का बसत आहेत. तेव्हा त्यांनी चीनच्या व्यक्तीची चौकशी करावी. हे पंतप्रधान मोदींचे कर्तव्य करावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

16:42 August 31

गणपती उत्सवातच संसदेचे सत्र, हे त्यांचे हिंदुत्व- अरविंद सावंत यांची मोदी सरकारवर टीका

संसदेच्या इतिहासात एकदाही सणाच्या काळात अधिवेशन झाले नाही. गणपती उत्सव असताना संसदेचे सत्र घेण्यात येणार आहे. हे त्यांचे हिंदुत्व आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंत सावंत केली आहे. ते इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्त माध्यमांशी बोलत होते.

16:05 August 31

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी ग्रँड हयात हॉटेल येथे दाखल

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी ग्रँड हयात हॉटेल येथे दाखल झाले आहेत. याच हॉटेलमध्ये राहुल गांधी पत्रकार परिषदेत घेणार आहेत.

15:36 August 31

थाळीमधील पंचतारांकित पदार्थ खाताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा विचार करावा-आशिष शेलार

मुंबई- मोदी सरकार विरोधात देशातील २८ विरोधी पक्ष एकवटले असून या सर्वांची बैठक आज व उद्या मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. या बैठकीवरून आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आरोप करायला सुरुवात केली आहे. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले, मुंबईत डरपोकांचा मेळावा घमेंडीया नावाने संपन्न होत आहे,असे म्हटले आहे. ते भाजपा प्रदेश कार्यालयात बोलत होते.

15:27 August 31

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी खासदार संजय राऊत यांची घेतली भेट, शेअर केला फोटो

इंडिया बैठकीनिमित्त मुंबईत आलेल्या जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

15:20 August 31

राहुल गांधींसह सोनिया गांधी मुंबईत दाखल, ढोल-ताशे वाजवून कार्यकर्त्यांनी केले स्वागत

काँग्रेस नेते राहुल गांधींसह सोनिया गांधी आज मुंबईत पोहोचले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केलीयं. ढोलताशांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत केलयं.

15:05 August 31

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे मुंबईत आगमन

इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पोहोचले.

14:27 August 31

ऐतिहासिक दिवस, नवा इतिहास रचला जाणार - प्रियांका चतुर्वेदी

हा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि आज एक नवा इतिहास रचला जात आहे. 2024 मधील निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती तयार केली जाणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी दिली.

13:40 August 31

उद्याच्या बैठकीचा अजेंडा आज रात्री ठरवणार - केसी वेणुगोपाल

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे 'इंडिया' आघाडीच्या तिसऱ्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज संध्याकाळी अनौपचारिक बैठक होणार आहे आणि बैठकीचा अजेंडा ठरवणार आहे. राहुल गांधी अदानी विषयावर पत्रकार परिषद घेत आहेत. अदानी यांचे बेकायदेशीर व्यवहार आहेत, पण सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राहुल गांधींनी उपस्थित केलेला प्रश्न प्रासंगिक आहे, पंतप्रधानांनी याचे उत्तर देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया केसी वेणुगोपाल यांनी दिली.

13:16 August 31

जुडेगा भारत, जीतेगा भारत - मेहबूबा मुफ्ती

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती या 'इंडिया' च्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. 'जुडेगा भारत, जीतेगा भारत' अशी प्रतिक्रिया मेहबूबा मुफ्ती यांनी यावेळी दिली.

13:04 August 31

मोदींची झोप उडाली - चौधरी

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगानं मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच झोप उडवली आहे, असं ते म्हणालेत. त्याचवेळी आता संबित पात्रा यांनी पंतप्रधानांच्यासाठी झोपेच्या गोळांची सोय करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसंच मोदींच्यासाठी इंडिया आघाडी म्हणजे एक धोक्याची घंटा असल्याचंही चौधरी म्हणाले.

12:22 August 31

उद्याच्या बैठकीत महत्वाचे निर्णय होणार - अशोक चव्हाण

बैठक संध्याकाळी 6 वाजता असेल.उद्याच्या बैठकीत काय चर्चा होईल यावर आता बोलणार नाही. उद्या मुख्य बैठक होणार आहे. 'इंडिया'चे नेतृत्व कोण करणार हे लवकरच कळेल. अनेक बडे नेते मुंबईत येत आहेत. त्यामुळे आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

11:48 August 31

आम्हाला आता कोणीही हरवू शकत नाही - संजय राऊत

एका बाजूला 'इंडिया' आघाडीची बैठक होतेय, तर दुसऱ्या बाजूला 'महायुती'ची म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची बैठक वरळी येथे होतेय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे आपल्या पक्षांच्या नेत्यांसह या बैठकीत सहभागी होतील. यावर संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे बैठक वर्षा बंगल्यावर घेऊ शकतात किंवा चंद्रावरही घेऊ शकतात. मात्र, ते आता 'इंडिया' आघाडीला हरवू शकत नाहीत. राहुल गांधी देशाचे निर्विवाद नेते आहेत आणि लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकारलंय. 'भारत जोडो यात्रा' करून त्यांनी काय केलं ते आपण सर्वांनी पाहिलं, असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

11:18 August 31

पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आम्हाला हवेत - संजय निरुपम

भारताचं राजकारण बदलत आहे. विरोधी पक्ष आता एक झाले असून, ते इतके ताकदवान आहेत की ते भाजपा सरकार हटवतील. मुंबईच्या 'इंडिया' बैठकीत अजेंडा ठरवला जाईल आणि समन्वय समितीही जाहीर केली जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिली. तसेच राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

10:38 August 31

मुंबईत होणारी 'इंडिया'ची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईत होणारी 'इंडिया'ची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप’ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. पंतप्रधान मोदींना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी केली.

09:30 August 31

विरोधी पक्ष जातीयवादी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी एकत्र ­ तेजस्वी यादव

विरोधी पक्ष जातीयवादी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. 'इंडिया' पंतप्रधानपदाचा उमेदवार हे पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त प्रामाणिक असतील आणि लोकांशी एकनिष्ठ असतील. आम्ही तुमच्या खिशातून 5 हजार रुपये घेतले आणि 200 रुपये परत केले, तर तो नफा की तोटा? हा निवडणूक स्टंट आहे, असे म्हणत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केंद्रावर जोरदार टीका केली.

09:02 August 31

कोणते नेते किती वाजता येणार मुंबईत?

कोणते नेते किती वाजता येणार मुंबईत?

मेहबुबा मुफ्ती - दुपारी 12 वाजता

एमके स्टॅलीन - सकाळी 11:45 वाजता

हेमंत सोरेन - सायंकाळी 5 वाजता

नितीश कुमार - सायंकाळी 5:20 वाजता

अरविंद केजरीवाल - सायंकाळी 6 वाजता

भगवंत मान - सायंकाळी 6 वाजता

ओमर अबदुल्ला - सायंकाळी 6:40 वाजता

अखिलेश यादव - दुपारी एक वाजता

08:54 August 31

'इंडिया'कडून नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार?

आजपासून मुंबईत 'इंडिया' आघाडीची बैठक होत आहे. दोन दिवसीय बैठकीत समन्वयक या महत्त्वाच्या पदावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सातत्याने सांगत आहेत की ते संयोजक किंवा पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत, परंतु त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे की ते संयोजक आणि पंतप्रधानपदासाठी सर्वात पात्र उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत जेडीयू दबावाचे राजकारण करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

08:41 August 31

'इंडिया' नेत्यांचे मुंबईत पोस्टर्स आणि होर्डिंग्ज

आजपासून सुरू होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीपूर्वी मुंबईत पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यात विरोधी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मुंबईत विविध ठिकाणी रस्त्याच्या बाजूला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावले आहेत.

07:46 August 31

भाजपाविरोधात लढण्यासाठी आम्हाला लोकांना एकत्र करावं लागेल - डी राजा

पाटणा येथील बैठकीत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला पराभूत करण्याचा आमचा संकल्प जाहीर केला. बंगळुरू येथील बैठकीत विरोधकांच्या आघाडीला आम्ही 'इंडिया' हे नाव दिलं. आता मुंबईतील बैठकीत आमचा लोगो जाहीर होईल, भाजपाविरोधात लढण्यासाठी आम्हाला लोकांना एकत्र करावं लागेल, अशी प्रतिक्रिया CPI सरचिटणीस डी. राजा यांनी 'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वी दिली.

07:00 August 31

ममता बॅनर्जींनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी

'इंडिया' आघाडीच्या बैठकीनिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. त्यांनी बुधवारी रात्री मातोश्री निवासस्थानी भेट दिली व रक्षाबंधननिमित्त उद्धव ठाकरे यांना राखी बांधली.

06:55 August 31

भारतीय राज्यघटना अधिक मजबूत करणे हा 'इंडिया' आघाडीचा उद्देश - मिलिंद देवरा

भारतीय राज्यघटना अधिक मजबूत करणे हा 'इंडिया' आघाडीचा उद्देश आहे. जात, लिंग किंवा प्रदेश अशांमध्ये आम्हाला भेदभाव करायचा नाही. मुंबईतील बैठक ऐतिहासिक असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी दिली.

06:28 August 31

'इंडिया' आघाडीची आज मुंबईत बैठक

मुंबई - 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज होत आहे. बैठकीसाठी विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. आज आणि उद्या अशी दोन दिवस ही बैठक होणार आहे. 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत लोगोही जाहीर केला जाणार आहे.(INDIA Alliance Meeting Mumbai) (INIDA Alliance Third Meeting) (INDIA Alliance Meeting Live) (Mahavikas Aghadi on INDIA Meeting)

वरिष्ठ नेते मुंबईत - 'इंडिया' आघाडीच्या समन्वयक पदाच्या नावाची घोषणा बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जाते. बैठकीसाठी ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव तसेच आपचे नेते आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत तयारीची माहिती दिली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केंद्र आणि भाजपावर जोरदार टीका केली.

मागील पंधरा दिवसापासून बैठकीचं नियोजन - 'इंडिया' आघाडीची बैठक मुंबईतील 'ग्रँड हयात' या पंचतारांकित हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी होत आहे. या बैठकीच्या तयारीसाठी गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष तयारीला लागले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून अनेक प्रकारच्या बैठका घेत कार्यक्रमांचं नियोजन केलं. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आढावा बैठक बुधवारी रात्री हॉटेल 'ग्रँड हयात' येथे पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

या मुद्द्यांवर होणार चर्चा - 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर चर्चा होणार आहे. 'इंडिया' आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

महायुतीची आज बैठक - विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. तर या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. 'इंडिया' आघाडीची बैठक 'ग्रँढ हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये पार पडणार आहे.

हेही वाचा -

  1. Mamata Rakhi To Amitabh Bachchan : रक्षाबंधनासाठी ममता बॅनर्जी अमिताभ बच्चन यांच्या घरी
  2. Bawankule Criticize INDIA : विरोधकांची आघाडी बारुद नसलेला बॉम्ब; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
  3. Cyrus Poonawalla On Sharad Pawar : शरद पवार यांना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी; आता त्यांनी निवृत्ती घ्यावी - सायरस पूनावाला

Last Updated : Aug 31, 2023, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.