मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानी महिलांचा वापर करून हनी ट्रॅपचे जाळे पसरवत आहेत. महाराष्ट्रासह देशात असे अनेक प्रसंग घडले आहेत. या हनी ट्रॅपमध्ये देशातील बडे अधिकारी आणि शास्त्रज्ञ देखील अडकले होते. इस्रायलची मोसाद, रशियाची केजीबी, अमेरिकन सीआयए असेल आणि भारतीय रॉ या सर्वच गुप्तचर यंत्रणा आपल्या शत्रू देशाची माहिती मिळवण्यासाठी हनीट्रॅपचा एक बलवान शस्त्र म्हणून वापर करतात. हा हनीट्रॅप सोशल मीडियावर चॅटींग नंतर व्हिडिओ कॉल पर्यंत पोहोचतो. या हनी ट्रपमधून बरेच बडे अधिकारी आणि तत्सम नेते देखील सेक्सटॉर्शनला बळी पडतात.
18 नोव्हेंबर 2022 मध्ये हनी ट्रॅपला बळी पडला परराष्ट्र मंत्रालयाचा ड्रायव्हर : परराष्ट्र मंत्रालयाचा ड्रायव्हर हनीट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला भारताची गुप्त माहिती पाठवायचा. या हनी ट्रॅपसाठी 2 मुलींनी सापळा रचला होता. 18 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या 46 वर्षीय श्रीकृष्णाला अटक केली. श्रीकृष्ण परराष्ट्र मंत्रालयात टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गुप्तचर संस्था आयएसआयच्या हनीट्रॅपमध्ये अडकून हा ड्रायव्हर पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवत होता, असा दावा तपास यंत्रणांनी केला होता.
इस्रोची गुप्तचर माहिती लीक : 9 नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये काम करणारे रॉकेट शास्त्रज्ञ प्रवीण मौर्य यांनी लिंकडीनद्वारे त्यांना हनी ट्रॅप केले जात आहे. गुप्तचर माहिती लीक करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती दिली होती. प्रवीण मौर्या यांनी तसे न केल्यास गुप्तहेरांनी त्याला जीवे मारण्याची आणि या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. त्यावेळी या शास्त्रज्ञाने इस्रो आणि केरळ पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकार्यांवर कट रचल्याचा आणि या हनी ट्रॅप गँगमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला होता. इस्रोने या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रवीणला निलंबित केले होते.
ब्राह्मोसची माहिती लीक केल्याचे तपास यंत्रणांना समजले होते : ब्राह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी 2018 मध्ये अटक केलेला ब्राह्मोस एअरोस्पेस प्रा. लि.चा कर्मचारी निशांत अग्रवाल हा देखील हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे उघडकीस आले होते. पाकिस्तानातील महिलांच्या बनावट फेसबुक प्रोफाईलशी चॅटिंगद्वारे त्याने ब्राह्मोसची माहिती लीक केल्याचे तपास यंत्रणांना समजले होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करीत निशांत अग्रवालला ताब्यात घेतले होते. त्याने शासकीय गोपनियता कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून निशांत अग्रवालला अटक करण्यात आली होती. निशांत हा नागपूरच्या उज्वलनगरचा रहिवासी आहे. तो इंजिनिअर असून ब्राह्मोस एअरोस्पेस प्रा. लि. मध्ये वैज्ञानिक म्हणून कामाला होता.