मुंबई CM Eknath Shinde : याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप होणार आहे आणि हा भूकंप विरोधक झेलू शकणार नाहीत. शिवडी-न्हावाशेवा हा फक्त एक मार्ग नाही तर विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा हा विकासाचा महामार्ग आहे. अबकी बार ४०० पार हा नारा मजबूत करण्यासाठी आमची जबाबदारी वाढली आहे. महाराष्ट्रात ४५ पार खासदार निवडून येणार आहे. मागे महाराष्ट्र थांबला होता. महाराष्ट्राचा विकास थांबला होता. तो मोदी यांच्या आशीर्वादानं सुरू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वांत जास्त इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. हा फक्त एक प्रकल्प नसून गेम चेंजर प्रोजेक्ट आहे. जो पूर्ण अर्थव्यवस्था बदलणार आहे. आमचे जे जे प्रस्ताव केंद्रात जातात त्यामध्ये कुठलीही कपात न करता ते मान्य केले जातात. (Lok Sabha Election 2024)
अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेला गती मिळाली: अहमदाबाद बुलेट ट्रेन योजना प्रोजेक्ट मागे थांबवण्यात आला होता; परंतु आमचं सरकार आलं आणि त्या कामाला गती आली. म्हणून देशाची प्रगती बुलेटच्या पद्धतीने होत आहे. तसेच देशातील करोडो भक्तांचं त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचही स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे असते तर मोकळ्या मनाने त्यांनी मोदी साहेबांचं अभिनंदन केलं असतं असंही मुख्यमंत्री म्हणाले.
देशामध्ये मोदी राज आहे- देवेंद्र फडणवीस: याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,अटल सेतू होऊ शकला. कारण देशामध्ये मोदी राज आहे. मोदी राज नसतं तर अटल सेतू कधीच झाला नसता. वास्तविक १९७३ मध्ये याची परियोजना ठेवण्यात आली होती. परंतु मागील ४० वर्षांमध्ये काहीच झालं नाही. मोदीजी प्रधानमंत्री झाले व देशात बदल झाला. यासाठी मोदीजींच्या सरकारने सर्व पर्यावरण मान्यता दिल्या. इथे बरेच लोक सांगत होते फ्लेमिंगो इथे राहणार नाहीत; परंतु आम्ही बीएसएमएस यांच्या माध्यमातून यावर उपाय काढले आणि फ्लेमिंगोची संख्या इथे वाढली आहे. यासाठी गुंतवणुकीवरूनसुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मोदीजींनी दिल्लीत कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन एमएमआरडीएला कर्ज दिलं आणि आमचं एमटीएचएलचं काम पूर्ण झालं. हा फक्त सेतू नाही तर त्याला आम्ही कोस्टल रोड बरोबरसुद्धा जोडणार आहोत. यावर्षी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटनसुद्धा पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार असा विश्वाससुद्धा याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: