मुंबई: अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. यामध्ये आता दर सहा महिन्यांनी पुलांच्या मजबुतीची तपासणी करून देखभाल-व आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
दर ६ महिन्यांनी तपासणी
दर सहा महिन्यांनी शहर विभागतील पुलांची व्हिज्युअल तपासणी दर सहा महिन्यांनी म्हणजेच वर्षात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात (पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर) करण्यात येणार आहे. यामध्ये पाच वर्षाचे कंत्राट दिले जाईल. नियमित तपासणीत पुलांमध्ये काही स्ट्रक्चरल दोष आढळल्यास आणि तीन वर्षांतून एकदा सर्व पुलांवचे सखोल व जवळून आणि नॉन डिस्ट्रक्टटिव्ह टेस्ट करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यानुसार कंत्राटदार आवश्यक दुरुस्तीही सुचवणार आहे. असे मुंबई महापालीकेने कळवले आहे.
17 types of investigations : पुलांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट होणार
मुंबईत अंधेरी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे पूल पडण्याची दुर्घटना घडली आहे. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. असे प्रकार घडू नये म्हणून धोकादायक पुलांच्या मजबुती व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (a structural audit for the safety of the bridges) करण्याचा निर्णय पालिकेने (Mumbai Municipal Corporation ) घेतला आहे. दर सहा महिन्यांनी ९८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. पुलांच्या १७ प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहेत. यासाठी पालिका ५ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.