मुंबई - योगाला जागतिक दर्जा मिळाला आहे. यामुळे त्याला आता बाहेरील देशातूनही मागणी मिळत आहे. त्यामुळे युवकांनी जर योग अभ्यासक्रम पूर्ण केला तर नक्कीच त्यांना यात रोजगार निर्माण होऊ शकतो, असे योगगुरू व मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी सांगितले.
योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नाही. योग हा सर्व वयोगटातील लोकांनी केला पाहिजे. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून योग करत होतो. निरोगी आरोग्य राखण्यासाठी नक्कीच योगाचा वापर केला पाहिजे. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत तसेच प्रसन्न मनासाठी योगा फायदेशीर आहे. काहीजण योगावर्गाला न जाता व्हिडिओ बघून योगा करतात. त्यात काही गैर नाही. परंतु, ते चुकत आहेत का बरोबर हे सांगायला कोणी नाही. म्हणून योगावर्ग लावले पाहीजे.
योगामध्ये अनेक करिअरच्या संधी आहेत. यामुळे युवकांनी योगा शिकला तर नक्कीच त्यांना यात करिअर करता येईल. फक्त जागतिक योगा करण्यात येतो. मात्र, इतर वेळेस योगाची जनजागृती होत नाही. त्यामुळे योगा हा शाळेतून शिकवला गेला पाहिजे, असेही देशपांडे यांनी सांगितले.