मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याात येणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्याकडे केली होती. आशिष शेलार यांनी तत्काळ ही बाब रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीला रेल्वे राज्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आशिष शेलार यांनी ट्विटद्व्रारे दिली आहे. तसेच यासाठी राज्य शासनाने रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
-
4 सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1/3
">4 सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
1/34 सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
1/3
-
हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली.
2/3
">हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली.
2/3हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली.
2/3
-
आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मा. रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे विद्यार्थ्यांतर्फे आभार!
3/3
">आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
मा. रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे विद्यार्थ्यांतर्फे आभार!
3/3आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
मा. रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे विद्यार्थ्यांतर्फे आभार!
3/3
राज्य सरकारचा प्रस्ताव हवा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सुचनेनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, एमपीएससीची परीक्षा
४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. यामुळे मुंबई आणि उपनगरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क केला. मात्र यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र दाखवून विद्यार्थ्यांना रेल्वेचे तिकीट देता येईल, असा पर्यायही त्यांनी सुचवला. त्यानंतर आशिष शेलार यांनी याची माहिती राज्याचे मुख्य सचिवांना दिली. त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.