मुंबई - कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी मुंबई उपनगर जिल्हास्तरावर राज्य सरकारने 'टास्क फोर्स' स्थापन केले आहे. महापालिका प्रशासन, पोलीस आणि बाल कल्याण समितीचे सदस्यांचा यात समावेश असेल.
अशी असेल समिती
मुंबईत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे काही मुलांचे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व बालकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरावर टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. तर उपनगरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार या समितीच्या सदस्य सचिव असणार आहेत. तसेच महापालिका, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी आणि बाल कल्याण समितीचे सचिव विक्रमसिंग भंडारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्राजक्ता देसाई हे देखील या समितीचे सदस्य असणार आहेत. सोमवारी (दि. 17 मे) या समितीची पहिली बैठक पार पडली. दरम्यान, अशा बालकांची माहिती गोळा करुन पुढील कार्य प्रणालीचा निर्णय घेण्यात आला आहे.
बालकांच्या मदतीसाठी येथे साधा संपर्क
चाईल्ड हेल्प लाईन - 1098 (24 तास सेवा उपलब्ध)
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर - ०२२-२५२३२३०८ किंवा ९७०२९६२०२५
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई उपनगर - ०२२-२५२३२३०८ किंवा ९१३६८९९८९१
बाल कल्याण समिती -१ (मुलुंड ते मानखुर्द) - ९९६७८१४७१७
बाल कल्याण समिती -२ (बांद्रा ते दहिसर) - ८७७९५०३६१२
हेही वाचा - मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या हजारपेक्षा कमी; 989 नव्या रुग्णांची नोंद