ETV Bharat / state

ST Workers Strike : संपामुळे झालेले नुकसान कामगाराकडून वसूल करू नयेत, एसटी महामंडळ काढले आदेश - MSRTC

एसटी महामंडळ ( MSRTC ) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी 10 मार्च, 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, आता संपकाळात एसटीचा झालेला तोटा हा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याची अपप्रचार करण्यात येत असल्याने एसटी महामंडळाने आज (दि. 5 मार्च) आदेश काढत कर्तव्यावर रुजू झालेल्या कामगारांकडून कसली ही वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही अस सांगण्यात आले आहेत.

एसटी महामंडळ
एसटी महामंडळ
author img

By

Published : Mar 5, 2022, 8:27 PM IST

Updated : Mar 5, 2022, 9:03 PM IST

मुंबई - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी 10 मार्च, 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, आता संपकाळात एसटीचा झालेला तोटा हा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याची अपप्रचार करण्यात येत असल्याने एसटी महामंडळाने आज (दि. 5 मार्च) आदेश काढत कर्तव्यावर रुजू झालेल्या कामगारांकडून कसली ही वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही अस सांगण्यात आले आहेत.

काय आहे आदेश - एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या साडे तीन महिन्यांहून अधिककाळ सुरू असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यवधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा अप्रचार सध्या सुरू असल्याने एसटी महामंडळाने आज एक आदेश काढत खुलासा केलेला आहे. आदेशात म्हटले आहे की, संप काळामध्ये जे कर्मचारी कामगीरीवर हजर होते व जे कर्मचारी 10 मार्च, 2022 पर्यंत कामगीरीवर हजर होतील त्यांना संपामुळे झालेल्या नुकसानाची वसुली करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे नोटीस देण्यात येऊ नयेत व दिली असल्यास तत्काळ रद्द करण्यात यावी व त्याबबातचा अनुपालन अहवाल या कार्यालयास (stgad@rediffmail.com) या मेलवर 7 मार्च, 2022 पर्यंत सादर करण्याचे आदेश आज एसटी महामंडळाने आपल्या सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात आलेले आहे.

आरोप पत्र मागे घेण्याचा सूचना - संप कालावधीमधील जे कर्मचारी 10 मार्च, 2022 पर्यत कर्तव्यावर रुजू होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत आरोपपत्र देण्यात येऊ नयेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना आरोपपत्र देण्यात आलेली असतील व सदरहू आरोप पत्रामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या नुकसान भरपाई संबंधी वसुली दर्शविण्यात आलेली असेल, असे आरोप पत्र तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात यावेत, अशा सूचनाही महामंडळाकडून सर्व विभागीय कार्यालयांना करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा - Toilet For LGBTQ : मुंबई शहरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणार, मंत्री अस्लम शेख यांची माहिती

Last Updated : Mar 5, 2022, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.