मुंबई - तब्बल पाच महिन्यानंतर आजपासून (20 ऑगस्ट) महाराष्ट्राची लालपरी रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. राज्य परिवहन विभागाच्या वतीने एसटी बसच्या आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आज सकाळी मुंबईतील कुर्ला नेहरूनगर स्थानकातून अहमदनगरला जाणारी बस पहिली बस रवाना झाली.
यावेळी स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर आणि एसटीच्या अधिकाऱ्यांनी या बसचे पूजन केले. त्यानंतर ही बस रवाना करण्यात आली. तसेच यावेळी बसचे वाहक, चालक व प्रवाशांचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आला. एसटी बसने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रवास करायचा असेल तर कोणत्याही प्रकारच्या पूर्वपरवानगी किंवा पासची गरज नाही.
या बसमध्य केवळ 22 प्रवाशांना प्रवासासाठी सोडण्यात आले. बसमधील प्रत्येक प्रवाशांचे तपामान तपासण्यात आले. काही मार्गावरील प्रवाशांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला तर काही मार्गावरील प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यापुढे एसटीची सेवा पूर्वी प्रमाणे सुरळीत करण्यात येईल, असे विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - मुंबईकरांना दिलासा... २१ ऑगस्टपासून २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात