ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : शिक्षण सचिवांना आली जाग; आज काढले कोरोना चाचणीच्या जबाबदारीचे पत्रक

author img

By

Published : Nov 17, 2020, 6:16 PM IST

राज्यात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि वर्ग सुरू केले जाणार आहे. या पार्श्वभूमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे सांगण्यात आले होते. मात्र, ही चाचणी कशी, कधी व कोठे करायची याबाबत काहीच सांगण्यात आले नव्हते. यावर ईटीव्ही भारत प्रकाश टाकला होता. त्यानंतर ईटीव्ही भारतच्या बातमीची दखल घेत. आज शिक्षण सचिवांनी कोरोना चाचणी संदर्भात एक नवीन पत्र जारी केले आहे.

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई - राज्यात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि वर्ग सुरू केले जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर आज (दि. 17 नोव्हेंबर) राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली जाणार होती. मात्र, ही चाचणी करण्यासाठी शिक्षण विभागातच ताळमेळ नव्हता. यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यासाठी काल (दि. 16 नोव्हेंबर) 'ईटीव्ही भारत'ने याविषयी वृत्त देऊन शालेय शिक्षण विभागाच्या या गोंधळाची वस्तुस्थिती मांडली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी आज कोरोना चाचणी संदर्भात एक नवीन पत्र जारी केले आहे.

या पत्रानुसार राज्यातील तब्बल सहा लाख शिक्षक आणि शिक्षकेतर यांची कोरोना चाचणी ही नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या मार्फत केली जावी, असे म्हटले आहे. तसेच कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात कालपर्यंत शालेय शिक्षण विभागाकडून शाळा आणि शिक्षकांना ही चाचणी कोणत्या ठिकाणी करावी, यासंदर्भात कुठल्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे या सर्व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही शालेय शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभारावर तीव्र शब्दात टीका केली होती. तर मुख्याध्यापक संघटनेसोबत शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनीही याविषयी निश्चित अशी कार्यपद्धती आणि चाचणी नेमकी कुठे आणि कशी केली जाणार याविषयी स्पष्ट करावे, अशी मागणी लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) शिक्षण सचिवांनी हे पत्र जारी केले असल्याने राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर यांना दिलासा मिळाला आहे.

असे आहे शिक्षण सचिवांचे पत्र

शिक्षण सचिवांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाने सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता 9 वे 12 वीचे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर, 2020 पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात स्थानिक प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत संबंधीत शिक्षकांची शक्यतो शासकीय केंद्रात कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी मोफत वैद्यकीय तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे नमूद केले आहे. यामुळे शिक्षकांची ही चाचणी सरकारी रुग्णालयात केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.