ठाणे - सोमवारी संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास ३५ वर्षीय तरुण कशेळी खाडीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि टीडीआरपी पथकाने खाडीत तरुणाचा शोध सुरु केला आहे. स्वप्नील तळेगावकर(३५) हा सोमवारी कशेळी खाडीत मुंबई-नाशिक महामार्गावर , अंजूर-दिवा येथे खाडीत पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर तरुणाने खाडीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अफवा उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, कळवा पोलीस, अग्निशमन दल यांनी १ रेस्क्यू व्हॅनच्या माध्यमातून तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु केले. दरम्यान सदर तरुण हा कशेळी खाडीत पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली. अद्याप तरुणाचा शोध लागला नाही अशी माहिती समोर आलेली आहे. कशेळी खाडीत पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी महामार्गावर एकच झुंबड उडालेली होती.
अपघात की आत्महत्येचा प्रयत्न
हा अपघात आहे की आत्महत्या याचा शोध आता पोलिस घेणार असून स्वप्निल मिळाल्यानंतरच या बाबतीमध्ये खुलासा होऊ शकणार आहे. दरम्यान या संदर्भामध्ये पोलीस अधिक तपास करत असून स्वप्नील च्या कुटुंबीयांचा यासाठी संपर्क साधला जात आहे.
हेही वाचा- जळगावात तरुणाची वडील आणि मामांच्या डोळ्यादेखत आत्महत्या