ETV Bharat / state

Re tendering of jetty : गेटवे ऑफ इंडियालगतच्या जेट्टीची फेरनिविदा निघणार - Gateway of India

मुंबईतील पर्यटकांच्या गर्दीने वेढलेल्या गेट ऑफ इंडिया लगतच्या जेटीवरील ताण कमी करण्यासाठी ५०० मीटर अंतरावर असलेल्या रेडिओ क्लब येथे १६५ कोटी रुपये खर्च करून नवीन जेटी बांधण्यात येणार आहे. मात्र, या कामासाठी निविदा जाहीर केल्यानंतर राज्य सरकारला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. एकच निविदा आल्यामुळे राज्य सरकारने या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन सचिवांनी दिली आहे. (Re tendering of jetty)

Jetty next to Gateway of India
गेटवे ऑफ इंडियालगत जेट्टी
author img

By

Published : Jul 24, 2023, 1:43 PM IST

मुंबई: मुंबईतील कुलाबा येथील रेडिओ क्लबजवळील जेटी ही टेनिसच्या रॅकेट आकाराची जेट्टी आहे. या ठिकाणी किमान २० प्रवासी बोटी उभ्या राहू शकतील, अशी व्यवस्था असणार आहे. राज्य सरकारने या योजनेला १६ वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. परंतु, सर्व मंजूऱ्या मिळाल्यानंतर यावर्षी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने बांधकामासाठी निविदा काढली. मात्र तरीही या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. केवळ एकच निविदा आल्यामुळे ही निवीदा प्रक्रिया रद्द करण्यात आली.

यासंदर्भात बोलताना परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन म्हणाले की, रेडिओ क्लबजवळ जेटी उभारण्याबाबत सर्व काही सोपस्कर पूर्ण करून निविदा जाहीर करण्यात आली होती. सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तसेच नियमानुसार किमान तीन कंपन्यांकडून निविदा येणे अपेक्षित असते. त्यामुळे एकमेव कंपनीची निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

सागरमाला योजनेसाठी उपयुक्त : केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुंबई जवळील पालघर, वसई, ठाणे आणि बेलापुरमधून जल वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी ५० टक्के रक्कम देणयाचा निर्णय घेतला आहे. ८ कोटी ३७ लाख रुपये खर्च प्रत्येकी खर्च करण्मयात आले आहेत. सोबतच ठाणे जिल्हा योजना समितीच्या माध्यमातून वाहनतळ आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

या ठिकाणी ७५ चारचाकी वाहने आणि ८५ दुचाकी वाहने उभी करण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी दिली. बेलापूर ते गेट वे वॉटर टॅक्सीदरम्यान, सद्या बेलापुर ते गेटवे ऑफ इंडिया या जल मार्गांवर नयन इलेव्हन बोटच्या माध्यमातून मेसर्स नयनतारा शिपिंग (प्रा.) लिमिटेड या कंपनीने वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली आहे.

२०० प्रवासी क्षमता या टॅक्सीची असणार आहे. ही टॅक्सी सोमवार ते शुक्रवार बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वाहतूक करणार आहे. वॉटर टॅक्सीच्या खालच्या डेकमध्ये १४० तर बिजनेस क्लास या वरच्या डेकवर ६० जण प्रवास करु शकतील. खालच्या डेकसाठी एका व्यक्तीला २५० रुपये तर बिजनेस क्लाससाठी एका व्यक्तीला ३५० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सीचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीनेही करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.