ETV Bharat / state

मुंबईत अमिन पटेल कामगिरीत अव्वल तर राम कदम सर्वात अकार्यक्षम आमदार

भाजप शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईमध्ये काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी कार्यकाळातील कामगिरीच्या जोरावर पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच, 2019 या वर्षातील कामगीरी बघता शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तर, भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम यांना पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

आमदार अमिन पटेल टॉपवर तर राम कदम सर्वात अकार्यक्षम आमदार
author img

By

Published : Aug 29, 2019, 8:50 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरवणाऱ्या मुंबई शहरातील आमदारांचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशनने जाहीर केला आहे. भाजप-शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईमध्ये काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी कार्यकाळातील कामगिरीच्या जोरावर पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच, 2019 या वर्षातील कामगिरी बघता शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तर, भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम यांना पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

आमदार अमिन पटेल टॉपवर तर राम कदम सर्वात अकार्यक्षम आमदार

प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार काँग्रेसचे आमदार अमिन पटेल हे मुंबईतील क्रमांक एकचे आमदार ठरले आहेत. गेली काही वर्ष सातत्याने त्यांनी ही कामगिरी कायम ठेवली आहे. पटेल यांच्यानंतर शिवसेनेचे माजी महापौर आणि विद्यमान आमदार सुनील प्रभू यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी करून बाजी मारली आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी सर्वात शेवटचा क्रमांक मिळवला असून बत्तीस आमदारांच्या यादीमध्ये शेवटून पहिल्या म्हणजेच 32 व्या क्रमांकावर राम कदम यांची वर्णी लागली आहे. प्रजा फाऊंडेशनने चर्चात्मक कौशल्य, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि भ्रष्टाचार या निकषांवरून तसेच आमदारांनी मतदारसंघात केलेल्या कामाच्या पद्धतीवरून सर्वेक्षण करून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती प्रजा फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, घटनात्मक जाणीव असणाऱ्या, सभागृहात साधक-बाधक चर्चा करणाऱ्या आणि चांगले धोरण राबवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभेत विजयी करावे, असे आवाहन प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी केले आहे.

Intro:

Body:आमदार अमिन पटेल टॉपवर तर राम कदम सर्वात अकार्यक्षम आमदार
प्रजा फाऊंडेशन नाही जाहीर केला मुंबईतील आमदारांचा लेखाजोखा

मुंबई ;देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरवणाऱ्या मुंबई शहरातील आमदारांचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशन ने जाहीर केला आहे भाजप शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईमध्ये काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी कामगिरीच्या जोरावर पहिला क्रमांक मिळवला असून भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम यांना पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे .प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार काँग्रेसचे आमदार अमिन पटेल हे मुंबईतील क्रमांक एक चे आमदार ठरले आहेत.गेली काही वर्ष सातत्याने त्यांनी ही कामगिरी कायम ठेवली असून अमीन पटेल यांच्यानंतर शिवसेनेचे माजी महापौर आणि विद्यमान आमदार सुनील प्रभू यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी करून बाजी मारली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईच्या नाम तालुक्यांमध्ये सर्वात शेवटचा क्रमांक मिळवला असून बत्तीस आमदारांच्या संख्येमध्ये शेवटून पहिला म्हणजे 32 व्या क्रमांकावर राम कदम यांची वर्णी लागली आहे प्रजा फाऊंडेशन ने चर्चात्मक कौशल्य गुन्हेगारी पार्श्वभूमी भ्रष्टाचार यावरून आमदारांनी मतदारसंघात केलेल्या कामाच्या पद्धतीवरून मतदारसंघातील लोकांचे जीवनमान सुधारले आहे का याबाबत सर्वेक्षण करून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे, असे प्रजा फाउंडेशनच्या संस्थापकाने व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर
पार्श्वभूमीवरती घटनात्मक जाणीव सभागृहातील साधक-बाधक चर्चा ची जाणीव आणि चांगले धोरण राबून यामुळे नागरिकांचे जीवन उंचावेल अशा उमेदवारांना आगामी विधानसभेत तिकीट देऊन विजयी करावे असे ,आव्हान प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.