ETV Bharat / state

कुलाब्यात ७ व्या मजल्यावरून ३ वर्षीय चिमुरडीला फेकले खाली; मुलीचा मृत्यू - गुन्हा

कुलाबा भागात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका ३ वर्षाच्या चिमुकलीला तिच्या पित्याच्या मित्रानेच ७ व्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकले यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनिल चुगांनी या आरोपीला अटक केली असून त्याला आज कोर्टात सादर केले जाणार आहे. काल (शनिवार) ही घटना घडली.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Sep 8, 2019, 12:28 PM IST

मुंबई - कुलाबा भागात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका ३ वर्षाच्या चिमुकलीला तिच्या पित्याच्या मित्रानेच ७ व्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकले, यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अनिल चुगांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात सादर केले जाणार आहे. काल (शनिवार) ही घटना घडली.

हेही वाचा - धक्कादायक! आईसह चिमुरड्याची बत्त्याने ठेचून हत्या

कुलाबा येथे राहणारे रमेशलाल रामनी यांना एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली आहेत. शनिवारी त्यांचे मित्र आरोपी अनिल याने रमेशलाल यांना सहकुटुंब कुलाबा येथील घरी बोलवले होते. रामनी यांची तीन वर्षांची मुलगी शनया घरात दिसली नाही. तिचा शोध घेतला असता ती अनिल राहत असलेल्या इमारती खाली पडल्याचे दिसले. तिला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा - घाटकोपरमध्ये घराचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही

या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस तपासात सुरुवातीला शनया हिला अनिल यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने बेडरूमच्या खिडकीतून फेकून दिल्याचा संशय आला होता. परंतु, अनिल यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आहे. अनिलला आज न्यायालयात हजर केले जाणार असून हत्येचे कारण शोधण्यासाठी कुलाबा पोलीस तपास करत आहेत.

Intro:मुंबई

कुलाबा भागात मनाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका 3 वर्षाच्या मुलीला तिच्या पित्याच्या मित्रानेच 7 व्या माळ्याच्या खिडकीतून खाली फेकले यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी
अनिल चुगांनी या आरोपीला अटक केली असून त्याला आज कोर्टात सादर केले जाणार आहे. शनिवारी ही घटना घडली.
Body:कुलाबा येथे राहणारे रमेशलाल रामनी याना 1 मुलगा आणि जुळ्या मुली आहेत. शनिवारी आरोपी अनिल याने रमेशलाल यांना कुटूंबासोबत कुलाबा येथील घरी बोलवले होते. रामनी यांची मुलगी शनया हिला बेडरूमच्या खिडकीतून आरोपीच्या घरी काम करणाऱ्या कामवाल्या बाईने फेकले संशय सुरवातिला आला होता.
नंतर अनिल वर संशय बळावला. पोलीस खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह कबुल केला. त्याने असे का केले याचा तपास कुलाबा पोलीस करत आहे.

नोट

संग्रहित फोटो वापरावाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.