ETV Bharat / state

प्रिन्स आणि राजेश मारूच्या कुटुंबियांना पालिका प्रत्येकी १० लाख रुपये देणार - प्रिन्स केईएम रुग्णालय

सध्या ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबीयांना दिले जाणार असून ५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जाणार आहेत. त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून प्रिन्सवर उपचार आणि शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. तसेच पालिकेच्या नायर रुग्णालयात राजेश मारू यांचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. त्यांच्याही कुटुंबीयाना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:30 PM IST

मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार घेताना भाजल्याने हात कापावा लागणाऱ्या प्रिन्स आणि नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू पावलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबियांना महापालिकेतर्फे प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालिकेच्या चुकीमुळे विविध दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मृत होणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंबंधीत धोरण बनावे यावर सर्व पक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिल्याची माहितीही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

उत्तर प्रदेशातून हृदयविकारावर उपचार घेण्यासाठी प्रिन्स नावाच्या दोन महिन्याच्या बालकाला केईएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन गादी जळाल्याने प्रिन्सचा हात, कान, डोक्याचा आणि छातीचा भाग जळाला होता. त्याचा हातदेखील कापण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले होते. रुग्णालयाचे डीन, डॉक्टर आदी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची तसेच प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांना पालिकेने ५ लाख रूपये देऊ केले होते. हे ५ लाख रूपये डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येणार होते. आणि ते प्रिन्स १८ वर्षाचा झाल्यावर वापरता येणार होते. प्रिन्सवर आता खर्च करण्याची गरज असताना पालिका रक्कम देत नसल्याने पालिकेने देऊ केलेले ५ लाख रुपये घेण्यास प्रिन्सच्या आई-वडिलांनी नकार दिला.

याबाबत आज गटनेत्यांच्या बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. सर्व पक्षीय गटनेत्यांच्या दवबावामुळे प्रशासनाला प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबीयांना दिले जाणार असून ५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जाणार आहेत. त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून प्रिन्सवर उपचार आणि शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. तसेच पालिकेच्या नायर रुग्णालयात राजेश मारू यांचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. त्यांच्याही कुटुंबीयाना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा - पालिका अनुदानित शाळांमधील २० वर्ष सेवा झालेल्यांना मिळणार स्वेच्छा निवृत्ती

नुकसान भरपाईसाठी धोरण बनवणार

मुंबईत नाल्यात पडून, झाडे पडून, खड्ड्यात पडून अनेकांचे मृत्यू होतात. या दुर्घटना पालिकेच्या चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आल्यास मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जावी अशी मागणी केली जाते. अशी आर्थिक मदत करता यावी, प्रिन्स व राजेश मारू यांच्या सारख्या दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता यावी म्हणून धोरण बनवण्याचा निर्णय आज गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यावर राज्य सरकार, रेल्वे, विमान कंपन्यांकडून ज्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते, त्याच धरतीवर आर्थिक मदत करता यावी असे धोरण बनवून गटनेत्यांच्या बैठकीत सादर करावे, असे निर्देश दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार घेताना भाजल्याने हात कापावा लागणाऱ्या प्रिन्स आणि नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू पावलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा निर्णय गंटनेत्यांच्या बैठकती घेण्यात आली. तसेच पालिकेच्या चुकीमुळे विविध दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मृत होणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पॉलिसी बनवावी यावर सर्व पक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. Body:उत्तर प्रदेश येथून केईएम रुग्णालयात हृदयाचा उपचार करण्यासाठी प्रिन्स नावाच्या दोन महिन्याच्या बालकाला भरती करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन गादी जळाल्याने प्रिन्सचा हात, कान, डोक्याचा आणि छातीचा भाग जळाला. त्याच्या हाताला गँगरिग झाल्याने त्याचा हात कापण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले आहेत. रुग्णालयाचे डीन, डॉक्टर आदी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची तसेच प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याच्या कुटूंबियांना पालिकेने ५ लाख रूपए देऊ केले होते. हे ५ लाख रूपये डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येणार होते. तसेच ते प्रिन्स १८ वर्षाचा झाल्यावर वापरता येणार होते. प्रिन्सवर आता खर्च करण्याची गरज असताना पालिका रक्कम देत नसल्याने पालिकेने देऊ केलेले ५ लाख रुपये घेण्यास प्रिन्सच्या आई वडिलांनी नकार दिला आहे. याबाबत आज गटनेत्यांच्या बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. सर्व पक्षीय गटनेत्यांच्या दवबावामुळे प्रशासनाला प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबियांना दिले जाणार असून ५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जाणार आहेत. त्यामधून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून प्रिन्सवर उपचार आणि शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. तसेच पालिकेच्या नायर रुग्णालयात राजेश मारू याचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता, त्याच्याही कुटुंबीयाना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

नुकसान भरपाईसाठी पॉलिसी बनवणार -
मुंबईत नाल्यात पडून, झाडे पडून, खड्ड्यात पडून अनेकांचे मृत्यू होतात. या दुर्घटना पालिकेच्या चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आल्यास मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जावी अशी मागणी केली जाते. अशी आर्थिक मदत करता यावी, प्रिन्स व राजेश मारू यांच्या सारख्या दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता यावी म्हणून पॉलिसी बनवण्याचा निर्णय आज गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दुर्घटना घडल्यावर राज्य सरकार, रेल्वे, विमान कंपन्यांकडून ज्या प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते, त्याच धर्तीवर आर्थिक मदत करता यावी अशी पॉलिसी बनवून गटनेत्यांच्या बैठकीत सादर करावी असे निर्देश दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले.

बातमीसाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.