ETV Bharat / state

कंगना रणौतच्या याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला राखून - कंगना रणौत घराचे पाडकाम

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबईपालिकेने केलेल्या तोडक कारवाई वरील याचिके संदर्भात सुनावणी पार पडली. या कारवाईत २ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे, यावर न्यायालयाने आता निकाल राखून ठेवला आहे.

verdict on Kangana Ranaut case
रणौतच्या याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला राखून
author img

By

Published : Oct 5, 2020, 12:48 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणाैत हिच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने तोडक कारवाई केली होती. त्या विरोधात कंगना रणौत हिने मुंबई महानगरपालिकेकडून 2 कोटींची नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली असून येत्या 8 ऑक्टोबरला या संदर्भातील निकाल मुंबई उच्च न्यायालय देणार आहे.

कंगनाच्या कार्यालयावरील तोडक कारवाई संदर्भातील याचिकेवर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू होती. या संदर्भात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे काथावाला आणि आर आय छागला यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निकाल राखून ठेवला आहे. आज झालेल्या सुनावनीत न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल ८ तारखेला देणार असल्याचे स्पष्ट केले.

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या याचिकेमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांना सुद्धा प्रतिवादी करण्यात आले होते. संजय राऊत त्यांच्या वकीलांकडून या संदर्भात त्यांचे म्हणणे मांडण्यात आले होते. अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कडून संजय राऊत यांच्या वक्तव्याची डीव्हीडी न्यायालयात सादर करण्यात आली होती. ज्यामध्ये संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'उखाड देंगे, उखाड दिया' अशा शब्दांचा वापर करून कंगना रणौतला धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

कंगना रणौत हिने मी मुंबईत येत आहे. कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा, दम है तो जो उखडना है उखाड लो असे ट्विट करून आव्हान दिले होते. तसेच तिने मुंबईला पीओके संबोधले होते. त्यानंतर शिवसेना कंगना विरोधात आक्रमक झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.