ETV Bharat / state

Mumbai Crime : घरात घुसून चोरले मौल्यवान दागिने; अवघ्या बारा तासात चोरास पोलीसांनी केली अटक

author img

By

Published : Feb 3, 2023, 11:17 AM IST

मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशाच एका चोरास मुंबईच्या समता नगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक करून त्याच्याकडून 11 तोळे सोने, रोख रक्कम आणि पाच किमती मोबाईल देखील जप्त केले आहेत. सुशांत दिनेश खेडेकर (23 वर्षे) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर चोरीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत.

Mumbai Crime
दागिने चोरास अटक
दागिने चोरास मुद्देमालासह अवघ्या बारा तासात अटक

मुंबई: मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात पहाटेच्या वेळी नागरिक काही कामानिमित्त, शौचालयासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्ती घरात घुसून मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि चार्जिंगसाठी ठेवलेले मोबाईल फोन घेऊन फरार झाले. याबाबतची तक्रार समता नगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या तक्रारीवरून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करून याचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडे सोपवण्यात आला होता.

गुन्ह्याची दिली कबुली: तपास अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण कक्ष टीम प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून तपासास सुरुवात केली. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून गुन्हे अभिलेखा वरील सुशांत दिनकर खेडेकर उर्फ सुसू हा परिसरात संशयास्पद रित्या फिरत असताना, गुन्हे प्रकटीकरण कक्षाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले अकरा तोळे दागिने, रोख रक्कम अकरा हजार आणि पाच महागडे मोबाईल हस्तगत केले आहे.

१२ तासाच्या आत घरातून चोरी: कांदिवलीतील समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका उघड्या घरातून एकुण किंमत अंदाजे ३,३५,००० रूपयेचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरी केलेली तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्हेचे गांभीर्य घेत तात्काळ गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस निरीक्षक संदिपान उबाळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व गुप्त बातमीदारांना विश्वासात घेऊन सदर घटनेबाबत हकिकत सांगून अज्ञात चोरट्या इसमाचा शोध करण्यास सुरूवात केली.

सापळा रचुन आरोपी अटक: शोध सुरु असताना एका गुप्त बातमीदाराने खात्रीलायक माहिती दिली कि, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे अभिलेखावरील घरफोडी करणारा आरोपी नामे सुशांत दिनेश खेडेकर उर्फ सुसू हा संशयास्पद फिरत होता. पोलिसांनी तात्काळ बोरीवली येथे रवाना होवुन आरोपी याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी देवीपाड़ा, बोरीवली पूर्व येथून सुशांत दिनेश खेडेकर हा दिसुन आला.पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस ठाणे येथे आणून गुन्हयासंबंधाशी कौशल्यपूर्व विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबूली दिली. अटक आरोपीचे नाव सुशांत दिनेश खेडेकर (२३) असून गुन्हयातील चोरीस गेलेले 100 टक्के मालमत्ता पोलिसांकडून पुनर्प्राप्ती करण्यात आले.

हेही वाचा: Mumbai Crime अवैधरित्या मुंबईत वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.