मुंबई - आम्ही लसी टोचवून घेतल्या आहेत, तुम्हीही टोचवून घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन मुंबईतील पहिली लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मधुरा पाटील व दुसरी लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मनोज पसांगे यांनी केले आहे.
बीकेसी कोविड सेंटरमध्ये मागील दहा महिन्यांपासून सेवा देणाऱ्या डॉ. मधुरा पाटील म्हणाल्या, आम्ही अनेक संकटांवर मात करत रुग्णांना उपचार दिले. आज महत्वाचा दिवस असून आज लस घेणारी मी पहिली कोरोना योद्धा असल्याचा अभिमान वाटत आहे. तर दुसरी लस घेणाऱ्या डॉ. मनोज पसांगे म्हणाले, लस घेऊन बराज वेळ झाला आहे. तरी मला काहीही त्रास झालेला नाही. तेव्हा लस सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही लस घेतली आहे, पुढे सर्वांनी लस घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन या दोघांनी केले.
हेही वाचा - चौकशीसाठी ईडीला पूर्ण सहकार्य करणार - एकनाथ खडसे
हेही वाचा - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान