ETV Bharat / state

वरळीत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 16 दिवसांवर; महापौरांनी दिली माहिती - वरळी कोरोना अपडेट

वरळी येथील वाढत्या रुग्णांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, वॉर्ड अधिकारी शरद उघडे आदी अधिकारी उपस्थित होते. वरळीच्या जी साऊथ विभागात कोरोनाचे 871 रुग्ण आहेत. त्यापैकी 305 रुग्ण बरे झाले आहेत तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Mayor Kishori Pednekar
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : May 5, 2020, 11:22 AM IST

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वरळी विभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 16 दिवसांवर आला आहे. वरळीमधील बीडीडी चाळीतील राहिवाशांकडून लॉकडाऊनचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे याठिकाणी 100 टक्के लॉकडाऊन करावे लागेल, अशी माहिती इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

वरळी येथील वाढत्या रुग्णांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक बैठक घेतली

वरळी येथील वाढत्या रुग्णांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, वॉर्ड अधिकारी शरद उघडे आदी अधिकारी उपस्थित होते. वरळीच्या जी साऊथ विभागात कोरोनाचे 871 रुग्ण आहेत. त्यापैकी 305 रुग्ण बरे झाले आहेत तर 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सध्या या विभागात 516 अॅक्टीव रुग्ण आहेत. रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी 35 टक्के आहे. या विभागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात असले तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 16 दिवसांवर गेला आहे, अशी माहिती महापौरांनी बैठकीत दिली.

दरम्यान, डिलाईट रोड येथील बीडीडी चाळीत लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वरळीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने या विभागातील नागरिकांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन महापौरांनी केले आहे. जर या विभागातील नागरिकांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले नाहीत तर 100 टक्के लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा महापौरांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.