ETV Bharat / state

साध्वीला विशेष न्यायालयाचा पुन्हा दणका, न्यायालयात कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची विनंती फेटाळली

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला मुंबई विशेष न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. साध्वीच्या वकिलांनी सुनावणीसाठी आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशातून तिला कायमस्वरूपी सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची विनंती पुन्हा फेटाळली आहे.

साध्वीला विशेष न्यायालयाचा पुन्हा दणका
author img

By

Published : Jun 20, 2019, 4:37 PM IST

मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला मुंबई विशेष न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. साध्वीच्या वकिलांनी सुनावणीसाठी आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशातून तिला कायमस्वरूपी सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, न्यायालयाने कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची विनंती पुन्हा फेटाळली आहे.

साध्वीला विशेष न्यायालयाचा पुन्हा दणका

साध्वी प्रज्ञासिंग ही भोपाळ लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आली आहे. संसदेत रोजच्या कामकाजासाठी तिला हजर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याच्या आदेशातून तिला सूट मिळावी, अशी साध्वीच्या वकिलांनी विनंती केली होती. मात्र न्यायालयाने साध्वीची ही विनंती फेटाळून लावली असून गुरुवारी झालेल्या सुनावणीसाठी साध्वीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, साध्वीला आठवड्यातून एकदा विशेष न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे.

दरम्यान, गुरुवारच्या सुनावणीत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य साक्षीदार व पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांची सरकारी वकिलांनी परत तपासणी केली. तर साध्वी प्रज्ञा सिंगच्या वकिलांनी उलटतपासणी केली.

Intro:2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भात मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिला पुन्हा दणका दिला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत साध्वीने तिच्या वकिलांमार्फत न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल करीत म्हटले की कोर्टाने सूनावणीसाठी आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशातून तिला कायमस्वरूपी सूट मिळावी. याच कारण देताना साध्वी ने म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीत ती भोपाळ मधून खासदार म्हणून निवडून आली असून , संसदेत रोजच्या कामकाजासाठी तिला हजर राहणे गरजेचे आहे.
Body:त्यामुळे आठवड्यातून एकादा न्यायालयात सुनावणी साठी हजर राहण्याच्या आदेशातून तिला सूट मिळावी म्हणून साध्वीच्या वकिलांनी विनंती केली होती. मात्र न्यायालयाने साध्वीची ही विनंती फेटाळून लावली असून गुरुवारी झालेल्या सूनावणीसाठी साध्वीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र साध्वी प्रज्ञा सिंग हिला आठवड्यातून एकदा विशेष न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे.दरम्यान गुरुवारच्या सुनावणीत 2008 मालेगाव ब्लास्ट मधील मुख्य साक्षीदार व पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांची सरकारी वकिलांनी सरतपासनी केली तर साध्वी प्रज्ञा सिंग च्या वकिलांनी उलटतपासणी केली. Conclusion:( साध्वीचे फाईल फुटेज जोडले आहेत.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.