ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी काढलेली सुंदर चित्रे म्हणजे कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती - महापौर पेडणेकर - महापौर किशोरी पेडणेकर बातमी

कोरोना काळात केलेले काम विद्यार्थ्यांच्या हृदयात खोलवर कोरले गेले असून ते आज त्यांनी काढलेल्या चित्रातून प्रतिबिंबित झाले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेली ही सुंदर चित्र म्हणजे कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Aug 15, 2021, 7:39 PM IST

मुंबई - कोरोना काळात केलेले काम विद्यार्थ्यांच्या हृदयात खोलवर कोरले गेले असून ते आज त्यांनी काढलेल्या चित्रातून प्रतिबिंबित झाले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेली ही सुंदर चित्र म्हणजे कोरोना काळात केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

चित्रांची पाहणी करताना महापौर किशोरी पेडणेकर

चित्र प्रदर्शनाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

कोरोना काळात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल गुरूकूल स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन शाॅप नं 1, वीरमहल काॅ. सोसायटी, डाॅ. आंबेडकर रोड, लालबाग, भारतमाता सिनेमासमोर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते रविवारी (दि. 15 ऑगस्ट) करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना महापौर बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, गुरुकुल संस्थेचे राजन कांबळी, सागर कांबळी, गोपाल खाडये तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

छायाचित्र
छायाचित्र

कार्यक्रमातून जबाबदारी आणखी वाढली

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आपल्या कार्याचे इतके बारीकतेने निरीक्षण करणारे मुंबईकर आहेत, हे बघून डोळ्यात पाणी आले. या विद्यार्थ्यांनी आपल्याला मुंबईची आई बनविले हे सोपे काम नाही. या सहृदय कार्यक्रमातून जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढेही अधिक तळागाळामध्ये जाऊन काम करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. हुबेहूब चित्र काढणारी पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील ही चिमुकली मुले आहेत. ते भविष्यातील मोठे चित्रकार, व्यंगचित्रकार होणार आहेत, यात तिळमात्र शंका नाही. लहान मुलांकडून मिळालेल्या प्रेमाने धन्य झाले, असेही महापौरांनी सांगितले. प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रकार चिमुकल्या विद्यार्थ्यांना गणेश मुर्ती भेट दिली. तसेच त्यांच्या संपूर्ण चित्रांचे अवलोकन केले.

हेही वाचा - शिवसेना आमदारांच्या कार्यालयासमोर आढळली फटाक्यांनी भरलेली गाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.