ETV Bharat / state

Uddhav Thackeray Criticizes CM : २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल... - फडणवीस सरकार

मुंबई येथे वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आज महाविकास आघाडींच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच 2024 ला होण्याऱ्या लोकसभा निवडणुका देशातील शेवटच्या निवडणुका असतील अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray Criticizes CM
Uddhav Thackeray Criticizes CM
author img

By

Published : Mar 15, 2023, 7:19 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी शिंदे फडणीस सरकारच्या विरोधात जनतेमध्ये जाऊन रान उठवणार असून यासाठी जून महिन्यापर्यंत महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सात सभेचे आयोजन करण्यात आल आहे. या सभेच्या आयोजनासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबई येथे वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली असून या बैठकीत तीनही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या राज्यभरातील स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केलं.

उद्धव ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका : यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाषण करतेवेळी शिंदे फडणवीस सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. 'भारतीय जनता पक्षात सामील व्हा नाहीतर तुरुंगत जा' अशी परिस्थिती सध्या देशभरात आहे. नेहमीच महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सध्या देशात असलेल्या या परिस्थितीत पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवेल अशी आशा आहे.

2024 देशातील शेवटची निवडणूक : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून काम करताना आपल्यावर आरोप केले गेले. घरी बसून सरकार चालवले. पण जे आपण घरी बसून केलं ते सुरत गुहाटीला जाऊन करू शकले नाहीत. आताची लढाई केवळ महाराष्ट्राचे नाही. सत्ता स्थापनेसाठी आपण एकत्र आलेलो नाही. सत्ता तर स्थापन करायची आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका या देशात लोकशाही टिकेल का नाही ? यासाठी होणार आहेत. ही निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. त्यामुळे यावेळची निवडणूक तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गावागावात पोहोचून लढावी लागेल. सत्ता स्थापन का करायची याचे उदाहरण आपण लोकांना द्यायचा आहे, अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण : लोकशाहीसाठी चार स्तंभ महत्त्वाचे असतात, मात्र या चार स्तंभा पैकी तीन स्तंभाची विल्हेवाट कधीच लावण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय हा एक शेवटचा आशेचा किरण आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी बाबत आपण आता काही बोलणार नाही. मात्र, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी जरी, असली तरी आपल्या देशात लोकशाहीचे वस्त्रहरण न्यायदेवता होऊ देणार नाही, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

पंचामृत बजेट मधून लोकांना काय मिळाले : शिंदे फडणीस सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनात पंचामृत बजेट सादर केले. पात्र पंचामृत हे पळी पळीने कोणाच्या वाट्याला येईल? हे सर्वांना माहिती आहे. दिलेले पंचामृत आपल्याच हातात घ्यायचे याने पोट भरल का नाही हे माहीत नाही. मात्र, पंचामृत घेऊन आपल्याच डोक्यावर हात फिरवायची पाळी जनतेवर आली असल्याचा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. जुनी पेन्शन योजना राज्य सरकार सुरू करत नाही एवढी मोठी महाशक्ती मागे असताना जुनी पेन्शन योजना का लागू करत नाही असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

विकले गेलेल्यांना मी थांबवले नाही : चाळीस गद्दार गेले हे मला कळले नाही का? पण त्यांना कशाला थांबवू. विकाऊ माणसे मला नको होती. मला लढाऊ माणसे पाहिजे. मी सर्वांना बोलून स्पष्ट सांगितले दरवाजा उघडा आहे. ज्यांना जायचे त्यांनी निघून जा मला विकाऊ लोक नको आहेत. कल्याणच्या सभेत आता जे जाऊन तिकडे बसले आहेत त्यांनी नाटक केले होते. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करता आहेत. हे मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही असे नाटक केले होते. तेव्हा मी भारतीय जनता पक्षासोबत आहोत, तेव्हा भारतीय जनता पेक्षा अतिरेक करत होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते, तर ते अतिरेक करतात त्यांना हवा तरी काय? असा टोला नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी लगावला.

या बैठकीला विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड असे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

हेही वाचा - Heavy Rain Warning : राज्यात पुढील 4 दिवसात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.