ठाणे Thane Murder : 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय विवाहित प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने तिची चाकूनं वार करून राहत्या घरातच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना कल्याण पूर्व विजयनगर आमराई परिसरात असलेल्या एका चाळीच्या घरात घडलीय. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विजय जाधव (वय ४८) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे.
चारित्र्याच्या संशयावरून वाद : याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मृत 38 वर्षीय विवाहिता ही पतीपासून विभक्त राहत होती. त्यातच गेल्या काही महिन्यापासुन रिक्षाचालक असलेल्या आरोपी विजय याच्याशी अनैतिक संबंध सुरु झाले. तेव्हापासून हे दोघंही कल्याण पूर्वेतील विजयनगर भागातील आमराई येथील एका चाळीच्या खोलीत 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहत होते. अशातच गेल्या काही दिवसांपासून आरोपी विजयला मृतक रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळंच वारंवार त्या दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून विजयनं राहत्या घरातच तिच्यावर चाकूनं हल्ला करत तिची हत्या केली. या घटनेची माहिती कोळशेवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलंय.
आरोपीला अटक : या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी सांगितलं की, कल्याणच्या आमराई परिसरात विजय जाधव आणि आता मृत असलेली विवाहिता गेल्या काही महिन्यांपासून 'लिव्ह इन' रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून विजय हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळं या दोघांमध्ये वाद होत होते. त्यातच विजयचा तिच्यासोबत पुन्हा याच कारणावरून वाद झाला आणि संतापलेल्या विजयनं तिच्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पथकानं आरोपीला ताब्यत घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केलीय. या घटनेचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
- Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या
- Delhi Crime : दिल्ली महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचा दोन वर्षानंतर उलगडा, तपासाकरिता पाठपुरावा करणारा 'तो' निघाला आरोप
- Amravati Crime: अमरावती हादरलं! सासू आणि मेहुण्याची जाळून हत्या केल्यावर जावयाची आत्महत्या