ETV Bharat / state

Maharashtra Politics: भाजपचे हिंदुत्व बेगडी, गायप्रेम ढोंगी; ठाकरे गटाच्या मुखपत्रातून टीकास्त्र - भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार

जिथे भाजप सत्तेत नाही, तिथे गोमाता गोमांस यावरून भाजपवाले पेटवापेटवी करतात. गोरक्षकांच्या झुंडशाहीच्या जोरावर स्वतःच्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. गोव्यापासून ईशान्येकडील भाजप शासित राज्यात गोमांसाची विक्री सरकारी इतमामात करायची, गोमांस खाण्याच्या वादाकडे कानाडोळा करायचा. भाजपाचे हे हिंदुत्व बेगडी आणि गायप्रेम ढोंगी असल्याची सामनामधून टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics
भाजपचे हिंदुत्व बेगडी, गायप्रेम ढोंगी
author img

By

Published : Feb 21, 2023, 9:50 AM IST

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार गाय आणि गोमांस याबाबत कायमच दक्ष असतो. विशेषता गोमांस भक्षणाबाबत ही मंडळी अटी तटीवरच असते. मी गोमांस खातो किंवा गोमांस खाण्यास गैर काय? असे कोणी बोलल्यास ही मंडळी त्याच्यावर तुटून पडतात. मात्र आता भाजपचे मेघालय प्रदेशाध्यक्ष एरनेस्ट मावरी माऊली यांनीच आपल्याच पक्षाची पंचायत केली आहे. मावरी यांनी उघडपणे आपण गोमांस खातो, ती आमची संस्कृती आहे आणि माझ्या पक्षाला यावर कोणताही आक्षेप नाही असे म्हटले आहे. यावर भाजप आणि परिवारातील मंडळींचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न उपस्थित करून हा भाजपचा आणि परिवाराचा दुटप्पीपणा असल्याची सामनामधून टीका करण्यात आली आहे.

भाजपाचा रंग गरजेनुसार बदलतो : भाजपाचा रंग त्यांच्या राजकीय गरजेनुसार बदलत असतो. इतरांनी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली, तर यांचा तीळपापड होतो. पण स्वतः काही करतात तेव्हा त्याला राष्ट्रीय गरज वगैरे तात्विक मुलामा दिला जातो. मेहबूबा मुक्ती सारख्या फुटीरतावादी आणि हिंदुत्वाच्या उघड विरोधक असलेल्या बाईच्या पक्षासोबत जम्मू-काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यात भाजप सत्तेत बसू शकतो. तेव्हाही त्यांचे हिंदुत्व संकटात येत नसते. भाजपाची भूमिका हिंदुत्वाबाबत, गोमांसबाबत सारखी असल्याचे सामानात म्हटले आहे. सामनातून भाजपवर निशाणा साधला गेला आहे. भाजपचे हिंदुत्ववादी धोरण, गायप्रेम खोटे हे ढोंगी असल्याचे म्हटले आहे.

हाताची घडी तोंडावर बोट : गोवा मेघालय किंवा ईशान्येकडील भाजपशासित राज्यातील गोमांस धोरणाचा विषय येतो, तेव्हा ती हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी याच महिन्यात ज्यांना नाईलाजास्तव गोमांस खावे लागले आहे, त्या लोकांसाठी आम्ही आमचे दरवाजे बंद करू शकत नाही. एरनेस्ट मावरी यांनी त्याच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. दोन वर्षापूर्वी मेघालयातील एक भाजप मंत्री सनबोर शुलाई यांनी चिकन, मटण, मासे यापेक्षा बीफ गोमांस खा त्यात मजा आहे. अशा शब्दात गोमांसाची तरफदारी केली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात 'बीफ'वरून देशभरात जे 'झुंडबळी' गेले ते भाजपच्या याच दुटप्पी गोप्रेमाचे बळी होते, अशी टीका करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सामना वृत्तपत्रातून भाजपच्या हिंदुत्वार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Devkinandan Thakur: देवकीनंदन ठाकूर यांचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,' पुढील पंचवीस वर्षानंतर भारत..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.