ETV Bharat / state

Thackeray Group Protest In Mumbai: जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे मुंबईत आंदोलन, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची - Thackeray Group Protest In Marin Drive Area

Thackeray Group Protest In Mumbai: जालनातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्लानंतर राज्यातील मराठा समाज (Thackeray Group Protest In Marin Drive Area) आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. (Lathicharge on Maratha protesters in Jalna)

Thackeray Group Protest In Mumbai
ठाकरे गट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 5:21 PM IST

मुंबई Thackeray Group Protest In Mumbai: जालनातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्लानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. (Thackeray Group Protest In Marin Drive Area) राज्यात मराठा संघटनांकडून वेगवेगळ्या ठिकाणी सरकार विरोधात निषेध करत निदर्शने केली जात आहेत. मुंबईत देखील या घटनेचे पडसाद उमटत असून रविवारी सकाळी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आली. (Lathicharge on Maratha protesters in Jalna)

मरीन ड्राईव्ह परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन: जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याचे लोन मुंबईमध्ये देखील पोहोचले आहे. मुंबई शहर व उपनगराध्यक्ष मराठा समाजात असंतोष पाहायला मिळतय. मराठा समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढे येत आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले. यात मराठा समाज बांधव देखील सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी देखील करण्यात आली.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची: जालनातील घटनेच्या निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने आज गनिमीकाव्याने छुप्या पद्धतीने आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. सकाळपासूनच ठाकरे गटाचे कार्यकर्ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जमू लागले होते. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला विरोध केला. या ठिकाणी आंदोलन करू शकत नाही, आझाद मैदानावर आंदोलन करावे असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. मात्र आंदोलक पोलिसांचे ऐकण्यास तयार नसल्याने, आंदोलन करणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची देखील झाली. आंदोलन करायला देत नसल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून मोर्चा काढत निदर्शने केली जाणार आहेत. राज्यभरात विविध राजकीय संघटनांकडून सध्या जालन्यात मराठा समाजावर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलने व निदर्शने केली जात आहेत.

हेही वाचा:

  1. Maratha Reservation issue: जालना येथील लाठीचार्जच्या घटनेनंतर राज्यभरात पडसाद, विरोधक आक्रमक
  2. SP Tushar Doshi on compulsory leave: लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर मोठी कारवाई, आंदोलक मनोज जरांगे यांनी 'ही' केली मागणी
  3. Jalna Maratha Protest : मंत्रालयातून आलेला 'तो' अदृश्य फोन कोणाचा? 'लाठीचार्ज'वरुन संजय राऊतांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.