मुंबई : कालच्या जाहिरातीविषयी आम्ही मत व्यक्त केले की बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचा साधा उल्लेख नाही. बाळासाहेबांचा फोटो नाही. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे ते स्पष्ट झाले. त्यांचे फडणवीस नाहीत हे सगळे काल स्पष्ट झाले. आज हे सगळे चित्र निदान जाहिरातीत तरी बदलले असले तरी प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही हे स्पष्ट दिसते. हितचिंतक अशी अडचणीत आणणारे जाहिरात देत नाहीत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष यांनी कितीही त्या निर्णयापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकाल द्यावा लागणार आहे. हे सरकार अपात्र ठरेल. पुढच्या दोन महिन्यात आणि हे सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळेल. मुख्यमंत्री काश्मीरला जाऊन आले. गुलबर्गला होते हॉटेल खैबर बिलामध्ये कोण आलं कोण गेले याच्याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. काय चर्चा झाली भविष्यात त्या उघड करणार आहे. दोन गटांमध्ये फडणवीस 105 आणि शिंदे गट 40 यांच्यामध्ये प्रॉक्सी वार सुरू झाला आहे. हे सरकार कोसळेपर्यंत प्रॉक्सी वार सुरू राहील.
सरकारला हार्ट अटॅक येऊ शकतो- फडणवीस यांचा कान दुखण्याचे कारण वेगळे आहे. महाराष्ट्रात वाहणारे वारे शिरले की कान दुखतोमला देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी पूर्ण आदर आणि सहानुभूती आहे. 105 आमदारांच्या नेत्याला ज्याप्रकारे चाळीस जणांनी मातेर पोतेर केले आहे. त्याच्यामुळे कान दुखणार बऱ्याच गोष्टी दुखू शकतात. पोटात दुखू शकतात. छातीत दुखू शकते. या सरकारला हार्ट अटॅक येऊ शकतो. जर त्यांची प्रकृती बरी नसेल ते नाराज असतील तर त्यांची नाराजी समजून घेतली पाहिजे.
तीन नेत्यांविरोधात तक्रार करणार-विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "विरोधकांवर अशाप्रकारे धाडी घालून दहशत निर्माण करणे, दबाव निर्माण करणे ही यामगची खेळी आहे. तामिळनाडूतल्या नेत्यांवर धाडी घालून अटक केली. महाराष्ट्रात आम्हाला अटक केली गेली. मंत्री दादा भुसे यांच्याविषयी मी पुढल्या दोन दिवसात ईडीकडे तक्रार करणार आहे. तिकडे तक्रार करून सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करणार आहे. 178 कोटी शेतकऱ्यांचे गोळा केले. ते पैसे आहेत कुठे? गिरण्या सहकारी साखर कंपन्याच्या नावाखाली मनी लॉन्ड्रींद ढासेय दोन दिवसात दादा भुसे यांच्या संदर्भात माझं डॉक्युमेंट दाखवणार आहे.
सगळ्यांना तुरुंगात जावे लागेल-यावर पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आता राहुल कुल देवेंद्र फडणवीस यांचे उजवे डावे हात आहेत. त्यांचे भीमा पाठक सहकारी कारखान्यात मनी लॉन्ड्रींग आहे. त्याची देखील मी तक्रार केली आहे. त्यावर कशामुळे धाडी पडत नाहीत? राधाकृष्ण विखे पाटलांच्या कारखान्याच्या प्रकरणासंदर्भात लवकरच भाष्य करेल. झाकीर नाईक याच्या संस्थेला किती पैसे दिले? त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील यांना का सोडता? त्यांच्यावरती या क्षणी कारवाई होणार होणार नाही. मात्र, सरकार बदलल्यावर सगळेच तुरुंगात जाणार आहे, असा राऊत यांनी इशारा दिला आहे.
हेही वाचा-
- Sanjay Raut Defamation Claim: संजय राऊत यांचा किरीट सोमय्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा; जाणून घ्या कारण...
- Sanjay Raut News: बाळासाहेबांचे वारसदार म्हणणाऱ्यांनी मोदींचा फोटो टाकला, पण..संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Sanjay Raut On Cm : संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, चार मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचा दावा