ETV Bharat / state

Bhaskar Jadhav on BJP : भाजप कोणाचा पक्ष? भास्कर जाधवांनी थेटच सांगितले... - आमदार भास्कर जाधव

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. भाजप हा व्यापारी, शेठजी, भटजीचा पक्ष आहे. त्यांना ग्रामीण भागाशी काही देणेघेणे नाही, असे जाधव म्हणाले. तसेच जागा वाटपावरून जाधव यांनी शिंदे गटाला चिमटे काढले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 4, 2023, 4:06 PM IST

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. भाजप शहरी भाग, व्यापारी, शेठजी आणि भटजींचा पक्ष आहे. ग्रामीण भागात त्यांना काही देणेघेणे नाही, अशी बोचरी टीका जाधव यांनी भाजपवर केली आहे. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरूनही जाधव यांनी शिंदे गटाला डिवचत खोचक टोला लगावला.

भाजप हा शेठजी, भटजीचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे. जागा वाटपात शिंदे गटाला भाजपकडून काहीच मिळणार नाही. या बोटावरील त्या बोटावर करण्यात देवेंद्र फढणवीस यांचा हात कोणीही पकडू शकत नाही - भास्कर जाधव, आमदार, ठाकरे गट

केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी - ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली. तसेच, 10 वीचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे कोकण पहिला राहिला आहे. हा बहुमान कायम राखायला हवा. जे नापास झाले असतील त्यांनी खचून जाऊ नये, नव्या जोमाने अभ्यासाला लागावे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

चिखलफेक न करण्याचा सल्ला - महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहोत. वेगवेगळे नेते वक्तव्य करत आहेत. आमचे प्रश्न प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सरकार आणि जनतेसमोर मांडतो. त्यामुळे असे वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवे. संजय राऊत आणि अजित पवार यांच्या विधानावरही जाधव यांनी भाष्य केले. संजय राऊत काय म्हणाले मला माहित नाही. परंतु एकमेकांना परस्परांचा आदर राखावा, एकमेकांवर चिखलफेक करू नये, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले. तसेच, आज अनेक नेत्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे. भाजपकडून असे प्रकार सुरू असून लोकप्रतिमा डागळण्यात येत असल्याचे जाधव म्हणाले.

जागा वाटपावरून शिंदे गटाला चिमटा - लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यानंतर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. लोकसभेसाठी भाजपने 48, विधानसभेसाठी 133 आणि मुंबई महापालिकेत दीडशे जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. शिंदे गटात यामुळे अस्वस्थता आहे. भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला सल्ला देताना, भाजपच्या आजवरच्या अजेंड्यावरच घाव घातला. देवेंद्र फडणवीस हे या बोटावरचे त्या बोटावर फिरवण्यात आणि शब्दच्छल करण्यात पटाईत आहेत, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला. भाजप आणि शिंदे गटाने किती वर्गणी केल्या तरी ताज्या सर्वेनुसार किमान सात जागा जिंकतील असा गोपनीय अहवाल आहे. लोकसभेला सोबत आणि विधानसभेला शिंदे गटाला बाहेर काढतील. महापालिकेत भाजपचे 28 नगरसेवक निवडून येतील, असेही जाधव म्हणाले. वंचित आणि संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचार करतील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांना स्पोर्टिव्ह कोण पुरवते? - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर 16 आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. न्यायालयाने भरत गोगावले यांचे प्रतोद पद बेकायदेशीर ठरवले आहे. विधानसभा अध्यक्ष वकील आहेत, त्यांना स्पोर्टिव्ह कोण पुरवते, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सत्तेत असलेल्या भाजपला त्याचे काही सोयर सूतक नाही. भाजपा शहरी भागाचा, व्यापाऱ्यांचा, आणि शेटजी, भटजीचा पक्ष आहे. ग्रामीण भागाचे त्यांना काही घेणेदेणे नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा -

  1. Bajaj Finserv project : बजाज फिनसर्व्हची पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक, राज्यात निर्माण होणार 40 हजार रोजगार-उपमुख्यमंत्री
  2. Ajit Pawar on OBC : भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे, ढोंगी लोकांचा पडदा पाडण्याचे काम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे- अजित पवार
  3. Nitesh Rane on Love Jihad : पावसाळी अधिवेशनात 'लव्ह जिहाद'विरोधात कडक कायदा येणार - नितेश राणे
etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.